Convicted Vikat Bhagat Dainik Gomantak
गोवा

Danielle McLaughlin Murder Case: डॅनियली मॅकलॉग्लीन बलात्कार आणि खून प्रकरण; विकट भगतला जन्मठेप

British Irish Tourist Danielle McLaughlin Murder Case: ब्रिटिश बॅगपॅकर डॅनियली मॅकलॉग्लीन (वय २८) हिच्या बलात्कार आणि खून प्रकरणात आरोपी विकट भगत दोषी आढळला आहे.

Pramod Yadav

Danielle McLaughlin Murder Case

मडगाव: ब्रिटिश बॅगपॅकर डॅनियली मॅकलॉग्लीन बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी आढळलेल्या आरोपी विकट भगतला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने विकटला शिक्षा सुनावली आहे. गुरुवारी (१४ फेब्रुवारी) विकट भगत डॅनियली मॅकलॉग्लीन बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी आढळल्यानंतर शिक्षेचा फैसला राखून ठेवला होता.

दक्षिण गोवा सत्र न्यायालयात गुरुवारी (१४ फेब्रुवारी) न्यायाधीश क्षमा जोशी यांनी दिलेल्या निकालात विकट भगतला भारतीय दंड संहितेच्या ३०२ (खून), ३७६ (बलात्कार) आणि २०१ (पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न) आदी कलमाखाली दोषी ठरवले. याबाबत शिक्षेचा निर्णय सोमवारी (१७ फेब्रुवारी) राखून ठेवण्यात आला होता. दरम्यान, सोमवारी विकट भगतला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विकट भगतला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती.

विकट भगत आणि डॅनियली यांच्यात मैत्री होती. दरम्यान, होळीच्या उत्सवानंतर विकटने डिनियलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. विरोधानंतर देखील विकटने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. व नंतर खून केला. राजबाग - आगोंद येथे १३ ते १४ मार्च २०१७ दरम्यान ही घटना घडली. डॅनियलीच्या अंगावर सात जखमा आढळून आल्या होत्या. काणकोण पोलिसांनी याच तालुक्यातून विकटला अटक केली होती.

काणकोण पोलिसांनी विकटविरोधात ३७४ पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. जानेवारी २०२५ मध्ये या खटल्याचे सलग दोन दिवस सुनावणी पार पडली. याच खटल्यासाठी दोन दिवस राखून ठेवण्यात आले होते. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी विकटला या प्रकरणात न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आले. अखेर आज (सोमवारी) त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

परदेशी पर्यटक डॅनियलीचा बलात्कार आणि खून प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील गाजले. आयरिश आणि ब्रिटिश असे नागरिकत्व असलेल्या डॅनियलीसोबत झालेल्या या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला होता. प्रकरणाची सुनावणी लवकर पूर्ण व्हावी असे मागणी आयरिश दूतावासाकडून करण्यात आली होती. अखेर याप्रकरणाचा निवाडा पूर्ण झाला असून, नराधम विकला जन्मठेप सुनावण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT