Vikat Bhagat: चांगल्या घरात जन्म, मौजमजेपायी चोऱ्या, शेवटी परदेशी तरुणीची बलात्कार, हत्या; गोव्यातला नराधम विकट भगत कोण आहे?

Danielle McLaughlin Murder Case: डॅनियली मॅकलॉग्लीन या युवतीशीही त्याचा संबंध आला. विकट दिसायला अगदी राजबिंडा असल्याने युवती त्याच्याकडे लगेच आकर्षित व्हायच्या.
Danielle McLaughlin Murder Case
Convicted Vikat BhagatDainik Gomantak
Published on
Updated on

Danielle McLaughlin Murder Trial

मडगाव: डॅनियली मॅकलॉग्लीन खून प्रकरणात शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) दोषी ठरलेला विकट भगत याची पार्श्वभूमी अगदी लहान असतानापासून गुंडगिरी स्वरूपाची असून डॅनियलीचा खून करण्यापूर्वी त्याच्या विरोधात वेगवेगळ्या स्वरूपाचे तब्बल १४ गुन्हे नोंद झाले होते. त्यामुळे त्याच्या विरोधात तडीपारीसाठी खटलाही सुरू होता.

एरव्ही विकट हा भगतवाडा-काणकोण येथील एका चांगल्या घरातील मुलगा; पण लहानपणापासून तो वाईट संगतीत गेल्याने बिघडत गेला होता. मौजमजेचे जीवन जगण्याची त्याला सवय जडली होती. त्यामुळे लहानसहान चोऱ्या करून तो पैसे एकत्र करायचा आणि ते तो आपल्या वाममार्गी छंदावर खर्च करायचा. त्याला अमली पदार्थांचेही व्यसन होते. याच त्याच्या जीवनशैलीमुळे त्याची विदेशी पर्यटकांमध्येही ऊठबस होती.

Danielle McLaughlin Murder Case
Danielle McLaughlin Murder Trial: हत्या प्रकरणाच्या निकालाला 'हाफ डे'चा खो; डॅनियली मॅक्लॉग्लीन प्रकरणाचा फैसला शुक्रवारी

डॅनियली मॅकलॉग्लीन या युवतीशीही त्याचा असाच संबंध आला. विकट दिसायला अगदी राजबिंडा असल्याने युवती त्याच्याकडे लगेच आकर्षित व्हायच्या. डॅनियली त्यापूर्वीही काणकोणला येत होती. तिची विकटशी सलगी होती. १७ मार्च २०१७ या दिवशी ती आपल्या एका मैत्रिणीबरोबर काणकोणला आली होती. विकटबरोबर होळीची मजा लुटण्यासाठी ती रात्री बाहेर पडली. त्याच रात्री नशेच्या अधीन असलेल्या विकटने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि डॅनियलीने त्याला विरोध केल्यामुळे खवळलेल्या विकटने तिचा गळा आवळला.

Danielle McLaughlin Murder Case
Danielle McLaughlin Murder: 'ती'ला समुद्र आवडायचा, होळीसाठी गोव्यात आली; दुसऱ्या दिवशी शेतात नग्नावस्थेत आढळला होता मृतदेह

त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. विकट तुरुंगात गेला; पण त्याची मस्ती काही कमी झाली नाही. एकदा तुरुंग रक्षकाला मारहाण केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर आणखी एक असे दोन गुन्हे नोंद झाले. खुनाच्या प्रकरणात त्याला दोषी ठरवले खरे; पण त्याच्या तोंडावर पाश्चात्तापाची एक साधी खूणही दिसली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com