Danielle McLaughlin Murder Trial: 28 वर्षीय तरुणीच्या बलात्कार, हत्येप्रकरणी नराधम विकट दोषी, मृत्यूदंडाची शिक्षा होणार?

Danielle McLaughlin Murder Case: विकट भगत भारतीय दंड संहितेच्या खून, बलात्कार आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे.
Danielle McLaughlin Murder Case
Convicted Vikat BhagatDainik Gomantak
Published on
Updated on

Danielle McLaughlin Murder Trial

मडगाव: गोव्यासह आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या ब्रिटिश बॅगपॅकर डॅनियली मॅकलॉग्लीन (वय २८) हिच्या बलात्कार आणि खून प्रकरणात आरोपी विकट भगत दोषी आढळला आहे. दक्षिण गोवा सत्र न्यायालयात गुरुवारी (१४ फेब्रुवारी) न्यायाधीश क्षमा जोशी यांनी हा निकाल दिला आहे. विकटला काय शिक्षा होणार याचा फैसला सोमवारी (१७ फेब्रुवारी) होणार आहे.

डॅनियली मॅकलॉग्लीन हिच्या हत्याप्रकरणाचा निकाल गुरुवारी लागणार होता. पण, न्यायालयाच्या अर्धवेळ कामकाजामुळे हा निकाल आज (शुक्रवारी) घेण्यात आला. न्यायाधीश क्षमा जोशी यांनी निकाल देताना विकट भगतला भारतीय दंड संहितेच्या ३०२ (खून), ३७६ (बलात्कार) आणि २०१ (पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न) आदी कलमाखाली दोषी ठरवले आहे. निकालच्यावेळी उपस्थित डॅनियलीच्या कुटुंबीयांनी याबाबत न्यायालयाचे आभार मानले आहेत.

Danielle McLaughlin Murder Case
Foreigners Died Suspiciously In Goa: देअर लास्ट ट्रीप! गोव्यात रहस्यमय पद्धतीने मृत झालेले विदेशी पर्यटक: भाग 1

दोषी विकट भगतला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. दरम्यान, त्याला न्यायालय काय शिक्षा सुनावणार याचा फैसला सोमवारी होणार आहे. १३ मार्च २०१७ रोजी काणकोणातील (Canacona) राजबाग-आगोंद येथे डॅनियलीचा खून झाला होता.  तब्बल सात वर्षानंतर तिला न्याय मिळाल्याची भावना तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. तसेच, न्यायालयाचे आभार मानले. डॅनियलीचे कुटुंबीय निकालावेळी न्यायालयात हजर होते.

काय आहे प्रकरण?

पर्यटनासाठी गोव्यात आलेल्या ब्रिटिश बॅगपॅकर  डॅनियली  मॅकलॉग्लीन आणि विकट भगत यांची मैत्री झाली होती. दरम्यान, विकट भगतने १३ मार्च २०१७ रोजी  काणकोणातील  (Canacona) राजबाग-आगोंद येथे लैंगिक अत्याचार करुन खून केला. खुनानंतर डॅनियलीचा मोबाईलही चोरीला गेला होता. तिच्या अंगावर ७ जखमा आढळून आल्या होत्या. 

Danielle McLaughlin Murder Case
Foreigners Suspiciously Died In Goa: बलात्कार, मारहाण, खून; गोव्यात रहस्यमय पद्धतीने मृत झालेले विदेशी पर्यटक: भाग 2

पोलिसांसमोर या खुनाचा छडा लावणे एक आव्हानच बनले होते. तत्कालीन पोलिस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी या खुनाचा छडा लावून काणकोण तालुक्यातील भगतवाडा येथील २४ वर्षीय विकट भगत याला अटक केली होती. काणकोण पोलिसांनी विकटवर  न्यायालयात एकूण ३७४ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com