Kadamba Smart Pass Dainik Gomantak
गोवा

Margao Canacona Bus: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मडगाव-काणकोण मार्गावर नवीन कदंबा सुरु; उशिरा प्रवासाची समस्या संपणार

Margao Canacona Kadamba Bus: सदर समस्‍या सोडविण्‍याच्‍या हेतूने काही प्रवाशांनी आमदार उल्‍हास तुयेकर यांना भेटून संध्‍याकाळी ७.३० आणि रात्री ८.३० वाजता अशा दोन बसेस सुरू कराव्यात अशी मागणी केली होती.

Sameer Panditrao

मडगाव: मडगाव-काणकोण मार्गावरील रात्रीच्या कदंब बसेस वाढवाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून वारंवार होत होती. त्‍या मागणीची दखल घेऊन सायंकाळी ७.३० वाजता काणकोणला जाणारी नवीन कदंब बस सुरू करण्यात आली आहे. याबद्दल प्रवाशांनी कदंब महामंडळाचे अध्यक्ष तथा नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांचे आभार मानले आहेत.

सदर बस मडगाव बसस्थानकावरून सायंकाळी ७.३० वाजता सुटून काणकोण बसस्थानकापर्यंत प्रवास करेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता काणकोण बसस्थानकावरून सुटेल. यामुळे प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.

सदर समस्‍या सोडविण्‍याच्‍या हेतूने काही प्रवाशांनी आमदार उल्‍हास तुयेकर यांना भेटून संध्‍याकाळी ७.३० आणि रात्री ८.३० वाजता अशा दोन बसेस सुरू कराव्यात अशी मागणी केली होती. मडगाव-काणकोण मार्गावर रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे.

काणकोणला प्रसिद्ध पर्यटनस्थळे असल्याने अनेक पर्यटकही येत असतात. शिवाय मडगाव, वेर्णा, वास्को, पणजीत काम करणाऱ्या काणकोणवासीयांच्या दृष्टीने अशी अतिरिक्त बससेवा ही अत्यंत आवश्यक आहे, याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले होते.

आमदार तुयेकर यांनी ही मागणी पूर्ण करण्याचे आश्‍‍वासन दिले होते. त्यानुसार आता बस सुरू झाली असून त्याबद्दल प्रवाशांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत. काणकोण, कुंकळ्ळी, बाळ्‍ळी तसेच पाडी, बार्से, बेंदुर्डे व मार्गावरील अन्य भागांतील लोकांसाठी लाभदायक असल्याने ही बस कायम सुरू राहील याची दक्षता घ्यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

रात्रीची बस चुकली तर व्‍हायची पंचाईत

यापूर्वी सायंकाळी ७ वाजता सुटणारी मडगाव-कारवार बस चुकल्यास वा ती पूर्ण भरल्यास प्रवाशांना आतमध्‍ये स्थान न मिळाल्यास एक तास बससाठी ताटकळत राहण्याची वेळ येत होती. कारण संध्‍याकाळी सातनंतर थेट शेवटची रात्री ८ वाजता सुटणारी वास्को-पोळे मार्गावरील बस पकडण्याशिवाय पर्याय नव्हता. यामुळे प्रवासी वैतागत होते. शिवाय शेवटच्या बसवर ताण येऊन ती प्रचंड भरून जात असे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Van Maulinge: '..आमचा गाव आम्हाला हवा’! वन-म्‍हावळिंगेत लोकांचा रुद्रावतार; घरांचे सर्वेक्षण रोखले, अधिकाऱ्यांना पाठवले माघारी

E Sakal: 'ई-सकाळ'चा भारतात डंका; ठरले मराठीतील नंबर 1 न्यूज पोर्टल

Bogus Voter List: सांताक्रुझमध्ये 3000, सुरावलीमध्ये 100 बोगस मतदार; काँग्रेसकडून पुरावे सादर; छोट्या घरात 26 नावे असल्याचा दावा

Lairai Stampede: 'लईराई' दुर्घटनेवरून अधिकाऱ्यांचे समितीकडे बोट, सूचना टाळल्याचा दावा; काय होता चौकशी समितीचा निष्कर्ष? वाचा..

Shivaji Maharaj: तोरणा किल्ल्यावर धन सापडले, शिवाजी महाराजांनी उभा केला अद्भुत गड; तरुणांसाठी प्रेरणादायी गोष्ट

SCROLL FOR NEXT