Bulbul International Children’s Film Festival Margao Dainik Gomantak
गोवा

मुलांच्‍या मनी कुतूहल, चेहरे आनंदले; 'बुलबूल बाल चित्रपट महोत्‍सवा'ला 44 शाळांतून 8 हजार विद्यार्थ्यांची उपस्‍थिती

Bulbul International Children’s Film Festival Margao: मडगाव येथील रवींद्र भवनात माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे अंतरंग प्रॉडक्शनच्या सहकार्याने भरवलेल्या तिसऱ्या बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवाला दुसऱ्या दिवशी उदंड प्रतिसाद लाभला.

गोमंतक ऑनलाईन टीम

सासष्टी: मडगाव येथील रवींद्र भवनात माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे अंतरंग प्रॉडक्शनच्या सहकार्याने भरवलेल्या तिसऱ्या बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवाला दुसऱ्या दिवशी उदंड प्रतिसाद लाभला. बुधवारी एकाच दिवसांत ४४ शाळांतील अंदाजे ८ हजार विद्यार्थ्यांनी या महोत्सवाचा आनंद लुटला.

दर दिवशी तीन सत्रांत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. सकाळच्या ८.३० ते ११ वाजताच्या सत्रात २०, ११ ते २ या वेळेत १५ व दु. २ ते ५ सत्रात ९ शाळांतील विद्यार्थ्यांनी महोत्सवाला भेट दिली. संपूर्ण दिवस रवींद्र भवन मुलांच्या चिवचिवाटाने गजबजले होते.

मास्टरक्लास कार्यक्रमात रक्षित टंडन यांच्या सायबर गुन्ह्यावरील मार्गदर्शनपर सत्रात मुख्य सभागृह खचून भरले होते, शिवाय खाप्रुमाम पर्वतकर सभागृहात व ब्लॅक बॉक्समधील चित्रपट पाहण्यातही मुलांनी गर्दी केली.

सकाळच्या सत्रात पालकांसाठी खास करून मातांसाठी आयोजित केलेल्या पाककला स्पर्धेतही ५० पेक्षा जास्त महिलांनी आपले पदार्थ घेऊन भाग घेतला. संध्याकाळी मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, लोकनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

परिणामकारक पालकत्व या दिलीप बेतकेकर यांच्या कार्यशाळेलाही पालकांनी मोठी गर्दी केली होती. शिवाय जादूचे प्रयोग, नृत्य प्रशिक्षण तसेच तारे जमीनपर या प्लेनिटोरियम डोमलाही मुलांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

जुन्या वस्तूंच्या दालनाचे शानदार उद्‍घाटन

१९८० पूर्वी गोव्यात लोक ज्या वेगवेगळ्या वस्तू लोक वापरत असत त्यांचे प्रदर्शन एका खास दालनात भरविण्यात आले आहे.

या दालनाचे उद्‍घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत तसेच सिने निर्माते व दिग्दर्शन नागराज मंजुळे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या प्रदर्शनात जुनी भांडी, रेडिओ, ग्रामाफोन, कंदील (लालटन), ताबुलफळे, समई अशा अनेक घरगुती व इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.

हा महोत्सव देशाच्या अन्य भागांतही व्हावा : टंडन

जुन्या वस्तूंच्या दालनाबाबत रक्षीत टंडन यांनी सांगितले की, हे दालन पाहून आपल्याला आजी आजोबाच्या जमान्यात घेऊन गेला. इथे मांडलेल्या वस्तू या मुलांनी पाहिल्या सुद्धा नसतील. ही एकदम चांगली संकल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.

इथे येऊन प्रत्यक्ष बुलबुल बाल चित्रपट महोत्सवाचा अनुभव घेतला. येथील माहोल पाहून व मुलांच्या चेहऱ्यावरील उत्साह पाहून हा महोत्सव म्हणजे अदभूत आहे. हा चित्रपट महोत्सव केवळ गोव्यात न राहता भारताच्या इतर भागांमध्ये आयोजित करणे उचित ठरेल असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America Iran Tension: "यावेळी गोळीचा निशाणा चुकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांना इराणची खुली धमकी; सरकारी टीव्हीवर हत्येच्या प्रयत्नाचे फोटो दाखवल्याने खळबळ

Goa Winter Session 2026: चिंबल ग्रामस्थांची विधानसभेवर धडक, 'युनिटी मॉल' रद्द करण्यासाठी सरकारला अल्टिमेटम; सभागृहात विरोधकांचा आक्रमक अवतार! VIDEO

मशाल मिरवणुकीत लोकप्रतिनिधींनी सहभागी व्हावे! तुये हॉस्पिटल कृती समितीचे आवाहन; अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

फूड स्ट्रीटचे पाच टक्के बांधकाम पाडा! पालिकेला नोटीस; अन्यथा अवमान याचिका दाखल करणार

Goa Assembly Live: विश्वजीत-युरींत जुंपली!

SCROLL FOR NEXT