World Cup: 2026 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला 'या' दिवशी रंगणार

Hockey World Cup 2026 : जागतिक हॉकी चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि उत्कंठावर्धक बातमी समोर आली आहे.
Hockey World Cup 2026
Hockey World Cup 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

जागतिक हॉकी चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि उत्कंठावर्धक बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (FIH) बुधवारी, १८ मार्च रोजी महिला आणि पुरुष हॉकी विश्वचषक २०२६ चे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, यंदा दोन्ही गटांचे विश्वचषक एकाच वेळी १५ ते ३० ऑगस्ट दरम्यान नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानसह एकूण ११ देशांनी दोन्ही श्रेणींमध्ये आपले स्थान निश्चित केले असून हॉकीच्या या महाकुंभाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

भारतीय पुरुषांची पहिली लढत वेल्सविरुद्ध, 'या' दिवशी होणार हाय-व्होल्टेज राडा

भारतीय पुरुष संघाच्या मोहिमेची सुरुवात १५ ऑगस्ट रोजी वेल्सविरुद्धच्या सामन्याने होणार आहे. भारतीय चाहत्यांसाठी सर्वात मोठा आकर्षण केंद्र ठरणारा सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान. १९ ऑगस्ट रोजी एम्स्टेलवीन येथील ऐतिहासिक वैगेनर हॉकी स्टेडियमवर हे दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येतील.

Hockey World Cup 2026
Goa Drugs Case: गोव्यात अंमली पदार्थांच्या तस्कराचा पर्दाफाश! 23.8 लाखांच्या ड्रग्जसह 59 वर्षीय ग्रीक नागरिकाला ठोकल्या बेड्या; हणजूण पोलिसांची कारवाई

या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी भारत १७ ऑगस्टला इंग्लंडशी भिडणार आहे. विशेष म्हणजे, ग्रुप स्टेजमधील भारताचे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६:३० वाजता सुरू होणार आहेत, ज्यामुळे चाहत्यांना प्राइम टाइममध्ये खेळाचा आनंद घेता येईल.

Hockey World Cup 2026
Horoscope: गुढीपाडव्याला नशीबाची गुढी! 'या' 3 राशींवर होणार धनाचा वर्षाव; प्रत्येक कामात यश मिळणार

महिला संघासमोर चीनचे आव्हान

भारतीय महिला हॉकी संघ देखील या विश्वचषकात आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाला आहे. महिला संघाचा पहिला सामना १६ ऑगस्ट रोजी चीनविरुद्ध होणार आहे. त्यानंतर १८ ऑगस्टला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि २० ऑगस्टला इंग्लंडविरुद्ध भारतीय रणरागिणी मैदानात उतरतील. या स्पर्धेचे उद्घाटन १५ ऑगस्ट रोजी ऑस्ट्रेलिया आणि जपान या महिला संघांच्या सामन्याने होणार आहे. ३० ऑगस्ट रोजी रंगणाऱ्या अंतिम सामन्याने या स्पर्धेची सांगता होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com