Goa Resort Sealed: फरार सुरिंदर खोसलाचे रिसॉर्ट केले सील, बर्च अग्नितांडवप्रकरणी 'मेझॉन्स लेक व्ह्यू'वर कारवाईचा बडगा

Surinder Kumar Khosla resort sealed Arpora: अग्नितांडव प्रकरणातील फरार संशयित सुरिंदर कुमार खोसला याचे हडफडे येथील ‘मेझॉन्स लेक व्ह्यू रिसॉर्ट’ जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी (१३ जानेवारी) सायंकाळी सील केले.
Goa Resort Sealed
Goa Resort SealedDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: सांकवाडी-हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ क्लबमधील अग्नितांडव प्रकरणातील फरार संशयित सुरिंदर कुमार खोसला याचे हडफडे येथील ‘मेझॉन्स लेक व्ह्यू रिसॉर्ट’ जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी (१३ जानेवारी) सायंकाळी सील केले.

सुरिंदर कुमार खोसला हा ब्रिटीश नागरिक असून, त्याच्या विरोधात हणजूण पोलिसांकडून लुक-आऊट सर्क्युलर जारी केले होते. खोसला हा बर्च क्लबस्थित मालमत्तेचा मालक आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध इंटरपोलची ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावली होती.

Goa Resort Sealed
Goa PWD: पीडब्ल्यूडीमधील 'ती' पदोन्नती बेकायदेशीर; सरकारला नोटीस, अधिकारांचा गैरवापर केल्‍याचा मुख्य अभियंत्यांवर आरोप

सध्या खोसला याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने हणजूण पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला होता. त्यानुसार खोसला याचे हडफडेमधील ‘मेझॉन्स लेक व्ह्यू’ हे रिसॉर्ट जिल्हा दंडाधिकाऱ्यांमार्फत सील करण्यात आले.

Goa Resort Sealed
Goa Winter Session 2026: गोवा पोलिसांचा 'सुपरफास्ट' अवतार! राज्याचा क्राईम डिटेक्शन रेट देशात सर्वाधिक; गुन्हेगारीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा

नोटिशीला प्रतिसाद नसल्याने कारवाई

सुरिंदर खोसलाचे रिसॉर्ट सील झाल्यावर तरी तो गोव्यात येतो की नाही, हे पाहावे लागेल. त्याच्या विरोधात लुकआऊट नोटीस तसेच इंटरपोलची ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com