Goa Casino: आठ कॅसिनोंनी थकवला 315.56 कोटी महसूल; एक प्रकरण कोर्टात; एकाचा परवाना निलंबित

Goa casinos 315 crore revenue default: कार्यान्‍वित असलेल्‍या आणि नसलेल्‍या आठ कॅसिनोंनी राज्‍य सरकारचा सुमारे ३१५.५६ कोटींचा महसूल थकवला आहे.
Goa Casino
Goa CasinoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : कार्यान्‍वित असलेल्‍या आणि नसलेल्‍या आठ कॅसिनोंनी राज्‍य सरकारचा सुमारे ३१५.५६ कोटींचा महसूल थकवला आहे. यातील एक प्रकरण न्‍यायालयात आहे, एकाचा परवाना निलंबित करण्‍यात आलेला आहे तर इतरांना नोटीस जारी करण्‍यात आल्‍याची माहिती मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून दिली.

आमदार एल्‍टन डिकॉस्‍टा यांनी यासंदर्भातील प्रश्‍‍न विचारला होता. राज्‍यात कार्यान्‍वित असलेल्‍या आणि नसलेल्‍या किती कॅसिनोंनी सरकारचा महसूल थकवला आहे?, त्‍यांच्‍यावर काय कारवाई करण्‍यात येत आहे? असे प्रश्‍‍न आमदार त्‍यांनी विचारले होते.

त्‍यावर मुख्‍यमंत्र्यांनी दिलेल्‍या उत्तरातील आकडेवारीनुसार आठ कॅसिनोंनी सुमारे ३१५.५६ कोटींचा महसूल अजून जमा केलेला नाही. त्‍यातील एका कॅसिनोचा परवाना निलंबित करण्‍यात आला आहे. एक प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तर, इतर कॅसिनोंना कारणे दाखवा नोटीस जारी केल्‍याचे स्‍पष्‍ट झाले.

Goa Casino
Goa Assembly Elections 2027: गोव्यात भाजपचं 'मिशन 30'! फातोर्ड्यात सरदेसाईंना घेरण्याची तयारी; मायकल लोबोंचं सूचक विधान

वर्षाला मिळतात १९२.५० कोटी

राज्‍यात जमिनीवरील आणि पाण्‍यातील मिळून एकूण २२ कॅसिनो सुरू आहेत. त्‍यांच्‍यामार्फत राज्‍य सरकारला प्रत्‍येक वर्षी १९२.५० कोटींचा महसूल मिळत असल्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उत्तरात म्‍हटले आहे.

Goa Casino
Goa Assembly Session: मंत्रिमंडळ निर्णयांच्या गोपनीयतेवरून विधानसभेत रणकंदन; 16 जानेवारीला चर्चेची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

कोणत्‍या कॅसिनोकडून किती थकीत?

मेसर्स ला कॅलिस्‍पो हॉटेल्‍स, प्रा. लि १०७.११

मेसर्स ट्रेड विंग्‍स हॉटेल्‍स लि. ८२.७०

मेसर्स एमकेएम ग्रॅण्‍ड गेमिंग अँड एंटरटेन्‍मेंट ८०

मेसर्स ब्रिटो ॲम्‍युसमेंट्स प्रा. लि. ०२.५०

मेसर्स राफ्‍लेस स्‍क्‍वेअर डेव्‍हलपमेंट प्रा. लि ७.५०

बिग बी लेसर एलएलपी १४

मेसर्स माचोस एंटरटेन्‍मेंट प्रा. लि. १८

मेसर्स गोल्‍डन ग्‍लोब हॉटेल्‍स प्रा. लि ०२.७५

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com