Marathi official language Dainik Gomantak
गोवा

Marathi: 'हा भाषेचा नाही, पोर्तुगिजांच्या 450 वर्षांच्या छळातून रक्षण केलेल्या भवितव्याचा प्रश्न'; मराठी राजभाषा बैठकीत चर्चा

Goa Language Dispute: ढवळी येथील सभागृहात झालेल्या, तालुका, जिल्हा व राज्यस्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या विशेष बैठकीत मराठी राजभाषा मागणीला सक्रिय संघटनात्मक पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Sameer Panditrao

फोंडा: गोव्यातील मराठी राजभाषेचा प्रश्न हा केवळ एका भाषेचा प्रश्न नसून, तो पोर्तुगिजांच्या ४५० वर्षांच्या रक्तलांछित धर्मच्छलास समर्थपणे आव्हान देऊन मराठीने रक्षण केलेल्या, गोव्याच्या सांस्कृतिक, धार्मिक व भारतीय राष्ट्रीयत्वाच्या भवितव्याचा प्रश्न असल्याच्या तीव्र जाणिवेतूनच मराठी राजभाषा निर्धार समितीच्या ३१ मार्चपासून सुरू झालेल्या चळवळीस पूर्णांशाने सक्रिय पाठिंबा, भारतमाता की जय संघ घोषित करत आहे, असे भारतमाता की जय संघाचे राज्यसंघचालक तथा शिक्षणतज्ज्ञ गोविंद देव यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या वेळी सांगितले.

ढवळी येथील सभागृहात झालेल्या, तालुका, जिल्हा व राज्यस्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या विशेष बैठकीत मराठी राजभाषा मागणीला सक्रिय संघटनात्मक पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे भारतमाता की जय संघटनेचे गोवा राज्यभरातील सर्व तालुक्यातील कार्यकर्ते, मराठी राजभाषा निर्धार समितीच्या प्रखंड-रचनेच्या माध्यमातून चाललेल्या मोहिमेच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय होणार असल्याने, मराठी चळवळीला मोठेच बळ लाभले आहे.

भारतमाता की जय संघाचे कार्यकर्ते आपल्या मातृसंघाबद्दल कोणताही संस्था-अभिनिवेष न ठेवता व बिनशर्तपणे मराठी राजभाषा निर्धार समितीच्या कामात सहभागी होतील, असे देव यांनी सांगितले.

दृकश्राव्य सादरीकरण व चर्चा

बैठकीच्या प्रारंभी, मराठी राजभाषा निर्धार समितीच्या मराठी राजभाषा मागणीसाठी मिळणाऱ्या लोक-प्रतिसादाचे दर्शन व विविध उपक्रमांची माहिती देणारे प्रभावी दृकश्राव्य सादरीकरण राज्यकार्यकारिणी सदस्य प्रा. आत्माराम गावकर यांनी पडद्यावर सादर केले. उपक्रमांचा धावता आढावा संदीप पाळणी यांनी घेतला. त्यानंतर संघाची सामूहिक प्रार्थना म्हणून बैठक संपली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT