Bicholim Matrushakti Melava Dainik Gomantak
गोवा

Marathi Official Language: "मराठी राजभाषा झालीच पाहिजे"! डिचोलीत महिलांचा जयजयकार; धालो, फुगडी, दिंडीतून व्यक्त केला निर्धार

Bicholim Matrushakti Melava: कोंकणीप्रमाणेच अभिजात असलेली मराठी भाषा ही राजभाषा झालीच पाहिजे, असा ठाम निर्धार डिचोलीत पार पडलेल्या मातृशक्ती मेळाव्याप्रसंगी उपस्थित महिलांनी केला.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: कोंकणीप्रमाणेच अभिजात असलेली मराठी भाषा ही राजभाषा झालीच पाहिजे, असा ठाम निर्धार डिचोलीत पार पडलेल्या मातृशक्ती मेळाव्याप्रसंगी उपस्थित महिलांनी केला. तसा एकमुखी ठरावही संमत करून प्रतिज्ञाही करण्यात आली. मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी व्यापक स्वाक्षरी मोहीम राबविण्याचा संकल्पही महिलांनी या मेळाव्यात केला.

मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे नाईकनगर-बोर्डे येथील वृंदा दीनानाथ तारी सभागृहात रविवारी या मातृशक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून मातृशक्तीच्या गोवा विभाग उपप्रमुख ॲड. रोशन सामंत उपस्थित होत्या. तसेच मातृशक्तीच्या जिल्हाप्रमुख श्रीविद्या डिचोलकर, डिचोली प्रखंड प्रमुख सुवर्णा परब व शुभलता कळंगुटकर यांची उपस्थिती होती.

मराठी भाषेला मोठी परंपरा आहे. मराठीमुळेच संस्कृती टिकून आणि शाबूत राहिली आहे. मात्र राजाश्रय मिळत नसल्याने मराठी भाषेचे अस्तित्व अंधारात आले असून ती लुप्त होण्याची भीती आहे, अशी खंत ॲड. रोशन सामंत यांनी व्यक्त केली.

कोकणी भाषेबाबत आम्हाला द्वेष नाही, मात्र मराठी भाषा टिकवणे ही काळाची गरज आहे. मराठीला हक्काचे स्थान मिळवून देण्यासाठी महिलांनीही निर्णायक पुढाकार घेण्याची आता वेळ आली आहे.

अन्यथा आताची पिढी भविष्यात आम्हाला दोष देणार, अशी भीती सामंत व्यक्त केली. डिचोली प्रखंडाचे मुकुंद कवठणकर यांनीही मार्गदर्शन केले. मराठीला राजभाषा करण्यासाठी राजकारण्यांवर अवलंबून न राहता आता निर्णायक संघर्ष करावाच लागेल. मराठीसाठी देशाच्या राष्ट्रपतींना सह्यांचे निवेदन देण्याची आता वेळ आली आहे, असे कवठणकर म्हणाले.

निर्मला शिरगांवकर आणि अंजली जोशी यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने मेळाव्याचा समारोप झाला.

मराठीचा जयजयकार

गावकरवाडा येथील शांतादुर्गा रवळनाथ महिला पथकाच्या दिंडी मिरवणुकीने मेळाव्याला सुरवात झाली. या पथकाने फुगडीही सादर केली. नार्वे येथील सप्तकोटीश्वर महिला मंडळाने धालो सादर केला.

धालो, फुगडी आणि दिंडी यामुळे लोकसंस्कृतीचे दर्शन घडतानाच, मातृशक्ती मेळाव्याची रंगत वाढली. याशिवाय भजन कविता सादरीकरण आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून मराठीचा जयघोष करण्यात आला. या कार्यकमात महिलांसह लहान मुलेही सहभागी झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT