Marathi Official Language: 'राजभाषेचा दर्जा द्या अन् वाद मिटवा'! मराठीप्रेमींचे आवाहन; मुख्यमंत्री निवासापुढे आंदोलनाचा दिला इशारा

Goa Language Dispute: मराठी भाषेलाही त्वरित राजभाषेचा दर्जा द्यावा. अन्यथा शासकीय निवासापुढे धरणे धरू, असा इशारा मराठी प्रेमींनी पेडणेत जुन्या बस स्थानकासमोर आयोजित धरणे आंदोलनावेळी दिला.
Goa Language Dispute
Goa Language DisputeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मोरजी: कोकणीसह मराठी भाषेलाही त्वरित राजभाषेचा दर्जा द्यावा. अन्यथा शासकीय निवासापुढे धरणे धरू, असा इशारा मराठी प्रेमींनी पेडणेत जुन्या बस स्थानकासमोर आयोजित धरणे आंदोलनावेळी दिला. घटनेनुसार मराठीलाही राजभाषेचा दर्जा देऊन सध्या कोकणी मराठीप्रेमींमध्ये पसरत चाललेला वाद कायमचा मिटवावा, असे आवाहनही केले.

मांद्रेचे माजी सरपंच ॲड. अमित सावंत म्हणाले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दिग्गज मराठी गायक महेश काळे यांचे गायन आपल्या साखळी मतदारसंघात ठेवतात. परंतु मराठी राजभाषा करण्यासाठी ते सरळ का बोलत नाहीत, असा सवाल करून मुख्यमंत्री जोपर्यंत मराठीला राजभाषेचा दर्जा देत नाहीत, तोपर्यंत मराठीप्रेमींनी मोठ्या गर्दीने त्यांच्या सरकारी निवासस्थानी आंदोलन छेडावे. आणि राज्यभाषा झाल्यानंतरच हे आंदोलन संपुष्टात आणावे, असे आवाहन ॲड.सावंत यांनी केले.

गोवा सरकारने अलिकडे शासकीय नोकऱ्यांसाठीच्या परीक्षेत कोकणीची प्रश्नपत्रिका सक्तीची करून नोकरीसाठी कोकणी उत्तीर्ण होणे अनिवार्य करून मराठीवर अन्याय केल्याचा, तसेच गोवा सरकारकडून मराठीवर सातत्याने होत असलेल्या अन्यायाचा प्रातिनिधिक निषेध करण्यासाठी मराठी राजभाषा निर्धार समितीच्या पेडणे व मांद्रे प्रखंडातर्फे पेडणे येथील जुन्या बसस्थानक चौकात धरणे आंदोलन करण्यात आले.

Goa Language Dispute
Marathi Official Language: 'शाळेतून मराठीचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न'! वेलिंगकरांचा आरोप; 2027 च्या निवडणुकीत पडसाद दिसतील असा इशारा

मांद्रेचे माजी सरपंच एड.अमित सावंत,मराठी राजभाषा निर्धार समितीचे केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य निवृत्त प्राचार्य गजानन मांद्रेकर,समितीचे राज्य युवाशक्ती प्रमुख विनायक च्यारी,पेडणे प्रखंडाचे अध्यक्ष मुख्याध्यापक शरद गावडे,निवृत्त मुख्याध्यापक रजनीकांत गावडे,निवृत्त शिक्षक लक्ष्मण गावडे,धारगळचे पंच सदस्य सतीश धुमाळ,युवा शिक्षिका संध्या आरोलकर यांची शासनातर्फे मराठीवर सतत होत असलेल्या अन्यायाचा निषेध करणारी भाषणे झाली.

Goa Language Dispute
Marathi: 'हा भाषेचा नाही, पोर्तुगिजांच्या 450 वर्षांच्या छळातून रक्षण केलेल्या भवितव्याचा प्रश्न'; मराठी राजभाषा बैठकीत चर्चा

गजानन मांद्रेकर यांनी समारोपाच्या भाषणात मराठी राजभाषा निर्धार समितीच्या आगामी कार्यक्रमांची माहिती दिली. शरद गावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.मांद्रे प्रखंडाचे अध्यक्ष आत्माजी नाईक यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Konkani Marathi Language Dispute
Gondhal Marathi Movie Oscar 2027 Official Entry
Subhash Velingkar Marathi Language Goa
Pramod Sawant MGP Political Limits
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com