Marathi Language: "मराठीला मानाचे स्थान दिल्याशिवाय मराठीप्रेमी गप्प बसणार नाही"! फर्मागुढीतील मातृशक्ती मेळाव्यात इशारा

Ponda Farmagudhi: मराठीलाही राजभाषेचा दर्जा द्यावा, असा एकमुखी ठराव रविवारी फर्मागुढी झालेल्या मराठी राजभाषा समितीच्या फोंडा प्रखंडातर्फे आयोजित महिला मातृशक्ती मेळाव्यात संमत झाला.
Marathi Language Goa
Marathi Language GoaDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: गोव्यात दैनंदिन जीवनात सर्व माध्यमांतून सरसकट मराठीचा सर्वाधिक वापर होत असून येथील कला आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी ज्या मराठी भाषेने योगदान दिले त्या मराठीला गोवा सरकारने राजभाषा कायद्यात दुरुस्ती करून कोकणीबरोबर मराठीलाही राजभाषेचा दर्जा द्यावा, असा एकमुखी ठराव रविवारी फर्मागुढी झालेल्या मराठी राजभाषा समितीच्या फोंडा प्रखंडातर्फे आयोजित महिला मातृशक्ती मेळाव्यात संमत झाला.

मातृशक्तीच्या प्रमुख डॉ. अनिता तिळवे यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी सर्व गोमंतकीय एकसंध होत असून मराठीला मानाचे स्थान दिल्याशिवाय मराठीप्रेमी गप्प बसणार नाही, असा इशारा दिला.

फर्मागुढीतील गोपाळ गणपती सभागृहात झालेल्या या मराठी मातृशक्ती मेळाव्याचे उद्‍घाटन साहित्यिक दीपा मिरिंगकर यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मी जोग यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Marathi Language Goa
Marathi Official Language: 'राजभाषेचा दर्जा द्या अन् वाद मिटवा'! मराठीप्रेमींचे आवाहन; मुख्यमंत्री निवासापुढे आंदोलनाचा दिला इशारा

यावेळी मराठी राजभाषा समितीचे मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर तसेच शाणूदास सावंत, दिवाकर शिंक्रे, डॉ. अनिता तिळवे, ॲड. रोशन सामंत, अनुराधा मोघे व इतर मान्यवरांचा समावेश होता. या मातृशक्ती मेळाव्यात भाषणांना फाटा देत मराठीसंबंधीचे उद्बोधक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यात सांगीतिक कार्यक्रमासोबतच प्रबोधन, योग तसेच इतर कार्यक्रमांचा समावेश होता. या कार्यक्रमात महिलांनी भाग घेत हा मेळावा यशस्वी केला. पूर्ण भरलेल्या सभागृहात महिलांची संख्या लक्षणीय होती.

Marathi Language Goa
Marathi Official Language: 'शाळेतून मराठीचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न'! वेलिंगकरांचा आरोप; 2027 च्या निवडणुकीत पडसाद दिसतील असा इशारा

पाच लाख सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना देऊया!

प्रमुख वक्त्या रोशन सामंत म्हणाल्या की, मराठी ही सर्व भाषांची आई आहे. कला आणि संस्कृती रक्षणासाठी मराठीने जे अमूल्य असे योगदान दिले आहे, ते कुणीही विसरू शकणार नाही. राष्ट्रपतींना मराठीला राजभाषा करण्यासाठी गोव्यातून सुमारे पाच लाख सह्यांचे एक निवेदन सादर करणे आवश्‍यक आहे, ज्यामुळे राष्ट्रपती गोव्यात मराठीला राजभाषा करण्यासाठी सरकारला आदेश देता येऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com