Cajetan Pereira Dainik Gomantak
गोवा

Goa News : समाजसेवक, मराठीप्रेमी कॅजिटन परेरा निवर्तले

आल्तीन, म्हापसा येथील निवासस्थानी निधन

दैनिक गोमन्तक डिजिटल

मराठीप्रेमी तथा प्रसिद्ध समाजसेवक कॅजिटन परेरा यांचे गुरुवारी (ता.6) सकाळी अल्पशा आजाराने आल्तीन, म्हापसा येथील निवासस्थानी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते.

मराठी राजभाषा चळवळीतील क्रियाशील कार्यकर्ता तथा जाज्वल्य मराठीप्रेमी, अशी त्यांची ख्याती होती. परेरा यांच्या पार्थिवावर 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता म्हापसा मिलाग्रीस चर्चजवळील दफनभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित पुत्र, विवाहित कन्या असा परिवार आहे. त्यांचे चिरंजीव विदेशात असल्याने रविवारपर्यंत ते गोव्यात पोचणार आहेत.

मोरजी येथील पीटर आल्वारिस हायस्कूलचे ते संस्थापक होते. मुख्याध्यापक म्हणून ते निवृत्त झाले. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच माजी उपसभापती शंभू भाऊ बांदेकर, माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप, अ‍ॅड. प्रभाकर नारुलकर, अ‍ॅड. गोपाळ काणेकर, निवृत्त मुख्याध्यापक दयानंद मांद्रेकर यांनी अंत्यदर्शन घेतले. परेरा नेहमीच अन्यायाविरुद्ध लढायचे. मराठी वृत्तपत्रांतून ते अन्यायाविरुद्ध आवाज उठवित.-

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT