Mapusa Pipeline News Dainik Gomantak
गोवा

Mapusa: जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया! म्हापशातील खोदकामांमुळे धुळीचे साम्राज्य; स्थानिकांना मनस्ताप

Mapusa Pipeline News: म्हापसा मतदारसंघात अनेक ठिकाणी वारंवार अंडरग्राउंड केबल व जलवाहिनीसाठी रस्त्यांचे खोदकाम सुरू असते.

गोमन्तक डिजिटल टीम

बार्देश: म्हापसा मतदारसंघात अनेक ठिकाणी वारंवार अंडरग्राउंड केबल व जलवाहिनीसाठी रस्त्यांचे खोदकाम सुरू असते. हे जवळजवळ दोन तीन वर्षे चालू आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना व वाहन चालकांना त्याचा त्रास होत आहे.

सध्या एकतानगर हाऊसिंगबोर्ड म्हापसा, गणेशपुरी म्हापसा या भागात जेसीबीच्या साहाय्याने पाण्याच्या जलवाहिनीसाठी रस्त्याच्या बाजूची गटारे खोदून त्यात जलवाहिनी घालण्याचे काम गेल्या दीड दोन महिन्यापासून सुरू आहे.

पण हे काम संथ गतीने चालू असल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरात धूळ जात आहे. या ठिकाणी वाहने ठेवण्यासाठी मिळत नाही. ठेवलेल्या वाहनावर धूळ बसत आहे.

म्हापसा परिसरात पाण्याची टंचाई भासत असून त्यात जलवाहिनी व अंडरग्राउंड केबल घातले जातात. त्यात पोकलीने ती खोदताना पूर्वीची जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाहून जाते. याकडे काम करणारे कामगार योग्य तऱ्हेने लक्ष देत नाही.

नगरसेवक परेश खोरजुवेकर म्हणाले, एकतानगर व गणेशपुरी येथे जलवाहिनी घालण्याचे काम सुरू आहे, ते लवकर पूर्ण करावे, एकतानगर हाऊसिंगबोर्ड परिसरात त्वरित डांबरीकरण करावे.

जलवाहिनी दुरूस्त करा

काही ठिकाणी कामगारांनी अर्धवट कामे केली आहेत. त्यामुळे धुळीचे साम्राज निर्माण झाले आहे. या परिसरात ये-जा करणाऱ्यांना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पाईप फुटून पाणी वाया जात आहे. त्याकडेही संबंधिताचे दुर्लक्ष होत होत आहेत. जलवाहिनी त्वरित दुरूस्त करण्याची नागरिकांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT