October Heatwave Dainik Gomantak
गोवा

October Heatwave: 41.4 अंश तापमानाने म्हापसा तापला? शहरातील उष्णतेच्या नोंदींकडे सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष असल्याचा आरोप

Mapusa Temperature 41.4 Degrees Claim: राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा वाढत असतानाच म्हापशातील तापमानाने मंगळवारी दुपारी २.२९ वाजता तब्बल ४१.४ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठल्याचा दावा संशोधक डॉ. नंदकुमार कामत यांनी केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा वाढत असतानाच म्हापशातील तापमानाने मंगळवारी दुपारी २.२९ वाजता तब्बल ४१.४ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठल्याचा दावा संशोधक डॉ. नंदकुमार कामत यांनी केला आहे. हा विक्रमी उच्चांक असल्याचे नमूद करत त्यांनी स्थानिक पातळीवरील तापमानाच्या नोंदींकडे सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून डॉ. कामत म्हापशातील तापमानाची माहिती ‘व्हॉट्सॲप’च्या माध्यमातून आपल्या निकटवर्तीयांपर्यंत पोहोचवत आहेत. तापमानातील बदलांविषयीही ते सावध करत आहेत. सोमवारीही म्हापशात सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता त्यांनी संदेशाद्वारे व्यक्त केली होती.

राज्यातील नागरिकांना वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागत असताना, त्यांच्या संरक्षणासाठी जबाबदार यंत्रणांकडून शहरनिहाय तापमानाच्या अचूक नोंदी ठेवण्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पणजी आणि मुरगाव येथील हवामानविषयक आकडेवारीवरच सरकारी यंत्रणांचे लक्ष केंद्रित असल्याने म्हापशासारख्या शहरांतील नागरिकांच्या उष्णतेविषयक समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October Temperature: पारा चढला, गोवा तापला! 37.2 अंश तापमानाची नोंद; उष्णतेमुळे यलो अलर्ट जारी

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

SCROLL FOR NEXT