Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

Aryan Narvekar 76 Runs: आर्यन नार्वेकर याने सोमवारी कर्णधारास साजेशी संयमी फलंदाजी केली, त्याला दिशांक मिस्कीन व जीवन चित्तेम यांचीही दमदार साथ मिळाली.
Aryan Narvekar 76 Runs
Goa CricketDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: आर्यन नार्वेकर याने सोमवारी कर्णधारास साजेशी संयमी फलंदाजी केली, त्याला दिशांक मिस्कीन व जीवन चित्तेम यांचीही दमदार साथ मिळाली. त्यामुळे २३ वर्षांखालील पुरुषांच्या कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर गोव्याने बडोद्याविरुद्ध पहिल्या दिवसअखेर ४ बाद २२७ धावा केल्या.

चारदिवसीय एलिट क गट सामना बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या ‘ब’ मैदानावर सुरू आहे. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा आर्यन ७६ धावांवर खेळत होता. त्याने २०७ चेंडूंचा सामना करताना १० चौकार व २ षटकार मारले.

Aryan Narvekar 76 Runs
Goa Assembly Women Representation: गोवा विधानसभेत महिलांचा आवाज आहे कुठे?

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर दहा धावांत तीन विकेट्स गमावल्यामुळे गोव्याचा डाव ३ बाद ५९ असा संकटात होता. आर्यन याने दिशांकला (४५ धावा, १६८ चेंडू, ४ चौकार, २ षटकार) याला साथीला घेत चौथ्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी करून संघाला सावरले.

नंतर दिवसअखेर त्याने जीवन चित्तेम (नाबाद ४५, ७० चेंडू, ७ चौकार) याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी ५६ धावांची अभेद्य भागीदारी करून संघाला सव्वादोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. त्यापूर्वी, देवन चित्तेम व शंतनू नेवगी यांनी गोव्याला ४९ धावांची सलामी दिली. मात्र नंतर या दोघांना, तसेच अमन धूपर यांना हेनिल पटेल याने दहा धावांच्या अंतराने माघारी धाडले.

Aryan Narvekar 76 Runs
Goa Water Crisis: आज पाणी वाहून जातेय, उद्या थेंबासाठी वणवण! संभाव्य पाणीटंचाईवर आताच नियोजन करा

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव : ८७ षटकांत ४ बाद २२७ (देवन चित्तेम २९, शंतनू नेवगी १४, अमन धूपर ७, आर्यन नार्वेकर नाबाद ७६, दिशांक मिस्कीन ४५, जीवन चित्तेम नाबाद ४५, हेनिल पटेल ३-४३) वि. बडोदा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com