Mapusa police quarters Dainik Gomantak
गोवा

Mapusa Police Quarters: म्हापसा पोलिसांचे ‘क्वाटर्स’ मोडकळीस! ‘साबांखा’चे दुर्लक्ष; कर्मचाऱ्यांची गैरसोय

Goa Police Quarters: म्हापसा पोलीस स्थानकात सर्वात जास्त गुन्ह्यांची नोंद होत असते. असे असूनही या पोलिस्थानकातील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी क्वाटर्स नसल्याने त्यांची अत्यंत गैरसोय होत असते.

Sameer Panditrao

बार्देश: ४० ते ५० वर्षपूर्वी म्हापसा पोलिस स्थानकाच्या कर्मचारी अन् त्यांच्या कुटुंबीयांसाठी तीन ‘क्वाटर्स’ बांधल्या होत्या. परंतु गोवा सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे त्या मोडकळीस आल्या आहेत. या तीन क्वाटर्समध्ये पूर्वी १६ कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय राहत होते. पण कालांतराने त्या हळूहळू मोडकळीस येऊ लागल्याने अनेकांनी हे क्वाटर्स सोडले आणि आपल्या मूळ गावी जाऊन राहू लागल्याने त्यांना ड्युटीवर येण्यास बराच त्रास होत आहे.

पोलिसांची ड्युटी ही कधीही असते. ड्युटी संपून घरी गेले तरी त्यांना अचानक म्हापश्यात काही झाल्यास झाल्यास पुन्हा बोलावले जाते. आणि ज्याची घरे दूर अंतरावर असतात, त्यांना पोलिस स्थानकात येण्यास वेळ लागतो. म्हापसा पोलीस स्थानकात सर्वात जास्त गुन्ह्यांची नोंद होत असते. असे असूनही या पोलिस्थानकातील कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी क्वाटर्स नसल्याने त्यांची अत्यंत गैरसोय होत असते.

या पोलिस स्थानकात महिला पोलिस कर्मचारीही आहेत. पण त्याही दूरवरच्या गावावरून येत असतात. त्यामुळे ‘अर्जंट’ म्हटल्यावर त्या महिला कर्मचाऱ्यांनाही तातडीने पोलिस स्थानकात यावे लागते. त्यामुळे त्यांच्यातही नाराजी पसरलेली असते. त्यामुळे व महिला कर्मचाऱ्यांकडून मागणी होत आहे की, पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांनी आपली नेमणूक घरापासून कुठेतरी जवळ करावी. जेणेकरून आयत्यावेळी पोलिस स्थानकात काम पडल्यास तातडीने पोलिस स्थानक गाठता येईल.

नाईलाजास्तव तिघांचे वास्तव्य

गोवा सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने गेल्याकाही वर्षांपूर्वी क्वाटर्स मोडकळीस आल्या असून त्या राहण्याजोग्या नाहीत, असा शेरा मारला होता. तरीही नाईलाजास्तव कर्मचारी त्या क्वाटर्स मध्ये राहत होते. एवढी वर्षे होऊनही सार्वजनिक बांधकाम खात्याने त्याकडे लक्ष दिलेले नाही. प्राप्त माहितीनुसार सध्या तीन कर्मचारी तिथे राहतात कारण त्यांना कधीही बोलावले जाते. परिणामी नाईलाजास्तव त्यात राहावे राहावे लागत आहे.

‘साबांखा’ने त्वरित काम हाती घ्यावे!

सार्वजनिक बांधकाम खात्याने हे मोडकळीस आलेले आणि जीर्ण झालेले पोलीस क्वाटर्स त्वरित पाडून नवीन बांधकाम करण्यासाठी सुरू करावे. तसेच ते सर्व सोयी सुविधांनी युक्त असावे, अशी मागणी पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे. खरेतर सध्याचे पोलिस स्थानक बांधताना या क्वाटर्सचेही बांधकाम व्हायला पाहिजे होते. पण ते ‘साबांखा’ने काम केले नाही, त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KTCL Recruitment Row: कदंब महामंडळाच्या मेगा भरतीला लागणार ब्रेक? कामगार आयुक्तांसमोरील 'ती' बैठक ठरली फोल; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

भारतानं पाकड्यांना पुन्हा तोंडावर पाडलं! वायुसेनेच्या डॉक्युमेंट्समुळे पाक लष्कराचा खोटारडेपणा जगासमोर; काय घडलं नेमकं?

Urban Planning: शहरांची ओळख की विद्रुपीकरण? बेशिस्त वाहतूक, पोस्टरबाजी आणि पादचाऱ्यांच्या 'जीवघेण्या' प्रवासाची भीषण वास्तवता!

Goa Voter List Row: गोव्यात 1.39 लाख मतदारांची नावे कट! सरकारच्या 'त्या' प्रक्रियेवरुन काँग्रेसचा हल्लाबोल; यादीतील घोळाविरोधात 'व्हॉट्सॲप हेल्पलाईन नंबर' जारी

Goa University: गोवा विद्यापीठात पीएचडी परीक्षा वादाच्या भोवऱ्यात! संशोधन प्रबंधाच्या निकषांवर सवाल; माजी प्राध्यापकांनी कुलसचिवांना विचारला जाब

SCROLL FOR NEXT