Missing Police Constable: ..घरच्यांनी सांगितले केरळला गेला! पोलिस कॉन्स्टेबल 2 वर्षे बेपत्ता; मायणा कुडतरीतील शिपायाला बडतर्फीची नोटीस

Maina Curtorim Police Constable Missing: पोलिस खात्यातील शिपाई बेपत्ता झाल्यानंतर त्याचा शोध खाते लावू शकलेले नाही. अखेर त्याला विनापरवानगी गैरहजर राहिल्याप्रकरणी बडतर्फ करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
Goa Police Crime
Goa Police CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पोलिस खात्यातील शिपाई बेपत्ता झाल्यानंतर त्याचा शोध पोलिस खाते लावू शकलेले नाही. अखेर त्याला विनापरवानगी कामावर गैरहजर राहिल्याप्रकरणी बडतर्फ करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.

पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, मायणा कुडतरी पोलिस ठाण्यातील शिपाई सनी शिंदे हा २०२३ पासून कामावर आला नसल्याचे पोलिस प्रशासनाच्या लक्षात आले आहे. त्याला शोधण्याचे प्रयत्न करण्यात आले.

त्याच्या घरी केलेल्या चौकशीवेळी तो उपचारासाठी केरळ येथे गेल्याचे सांगण्यात आले होते. ३० जुलैपासून तो कामावर आला नसल्याने त्याच्याविरोधात कारवाई करण्याचे ठरवण्यात आले आहे. केरळमधील उपचाराबाबत कुटुंबीयांकडून कोणतीही कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत.

Goa Police Crime
Goa Police: 3 वेगवेगळे आरोप, 2007 साली बडतर्फ; खंडपीठाच्या आदेशानंतर निलंबित हवालदार 18 वर्षांनंतर सेवेत

त्यामुळे आता १५ दिवसांत त्याने कामावर परतावे अन्यथा बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे. त्याने स्वेच्छेने काम सोडले असे मानून ही कारवाई करण्यात येणार आहे, असे सुत्रांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर शिंदे याला अंतिम संधी म्हणून १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. अन्यथा, सेवा बडतर्फीचा निर्णय अमलात आणला जाणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.

Goa Police Crime
Goa Police: खून प्रकरणातील आरोपी, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सहकाऱ्याला गोवा पोलिसांनी कशी अटक केली?

शिस्तभंगाविरोधात कठोर पाऊल

पोलिस विभागात अशाप्रकारे दीर्घकाळ बिनकामाचे बेपत्ता राहणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचे हे ताजे उदाहरण ठरत असून शिस्तभंगाविरोधात कठोर पाऊल उचलल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com