Goa Police Fitness: गोवा पोलीस होणार 'फिट अँड फाईन'! तंदुरुस्तीसाठी उचलले मोठे पाऊल; प्रो-बोनो ट्रेनिंग प्लॅन उपलब्ध

Goa Police health initiative: गोवा पोलिस दलाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व तंदुरुस्तीच्या उन्नतीसाठी पाऊल उचलत गोवा पोलिस व ‘योसका टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स प्रा. लि.’ यांच्यात सामंजस्य करार केला आहे.
Goa Police health initiative
Goa Police health initiativeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा पोलिस दलाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व तंदुरुस्तीच्या उन्नतीसाठी मोठे पाऊल उचलत शुक्रवारी गोवा पोलिस व ‘योसका टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स प्रा. लि.’ यांच्यात सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. ‘योसका’ ही देशातील आघाडीची फिट-टेक व एंड्युरन्स स्पोर्ट्स कंपनी असून ‘आयर्नमॅन ७०.३ गोवा’ व ‘हाय्रॉक्स इंडिया’ सारख्या उपक्रमांमुळे ती प्रसिद्ध आहे.

या कराराअंतर्गत ‘योसका’ कंपनी गोवा पोलिस दलाला ५ हजार प्रो-बोनो ट्रेनिंग प्लॅन उपलब्ध करून देणार असून त्यांची किंमत सुमारे १.१ कोटी रुपये आहे. ही सुविधा पोलिसांना मोफत दिली जाणार आहे. याशिवाय वर्षातून तीन सार्वजनिक धावण्याचे उपक्रम आयोजित करण्याची जबाबदारीही ‘योसका’ घेणार आहे, ज्यामुळे समाजातही आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार होईल.

Goa Police health initiative
Missing Police Constable: ..घरच्यांनी सांगितले केरळला गेला! पोलिस कॉन्स्टेबल 2 वर्षे बेपत्ता; मायणा कुडतरीतील शिपायाला बडतर्फीची नोटीस

या करारावर गोवा पोलिस महासंचालक यांच्या वतीने पोलीस अधीक्षक (क्रीडा) सुनीता सावंत यांनी स्वाक्षरी केली. तर ‘योसका टेक्नॉलॉजी सोल्यूशन्स प्रा. लि.’च्या प्रतिनिधींनी करारावर सही केली. या उपक्रमामुळे गोवा पोलिस दलात फिटनेस व वेलनेसची संस्थात्मक संस्कृती विकसित होणार असून, त्याचबरोबर गोमंतकीय समाजालाही आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्यास प्रेरणा मिळणार आहे.

Goa Police health initiative
Goa Police: गोवा पोलिसांची मोठी कारवाई, चोरीला गेलेले 50 मोबाईल फोन जप्त

शारीरिक तंदुरुस्ती ही केवळ व्यावसायिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठीच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यासाठीदेखील तितकीच महत्त्वाची आहे. वेळोवेळी प्रशिक्षण घेणे हे शिस्त, सज्जता व लवचिकता टिकवण्यासाठी आवश्यक आहे. तसेच प्रशिक्षण घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांनाही याचा लाभ मिळवून द्यावा.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com