Goa Weather Update: काणकोणमध्ये वादळी पावसाचा तडाखा! चावडीत झाड कोसळून वाहतूक कोंडी; शेळेरमध्ये घराचे अडीच लाखांचे नुकसान

Goa Traffic News: काणकोण तालुक्यात शुक्रवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने आणि पावसाने जोरदार हजेरी लावली.
Goa Traffic News
Goa Weather UpdateDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

चावडी: काणकोण तालुक्यात शुक्रवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने आणि पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. दरम्यान, चावडी येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाड रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.

दुपारच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. काही वेळातच पावसाचा जोर वाढल्याने रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली. शाळा-महाविद्यालयांतून घरी परतणारे विद्यार्थी, तसेच कार्यालयीन कामासाठी बाहेर पडलेले नागरिक आणि नोकरदारांना पावसापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित आसरा शोधावा लागला.

Goa Traffic News
Goa Agriculture: डिचोलीत परतीच्या पावसाचा भातशेतीला फटका! मयेतील भातपीक आडवे, बळीराजा चिंतेत

वादळी पावसाने पडझड

अवकाळी पावसामुळे शेळेर येथे शंकर नाईक यांच्या घरावर एकेशिया वृक्ष कोसळून छप्पर तुटले व भिंतींना तडे गेले. सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पावसामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली, शेतीची कामे खोळंबली आणि पर्यटन व्यवसायालाही फटका बसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com