Peddem theft Dainik Gomantak
गोवा

Mapusa Police: पेडे येथे घरफोडी करणारे दोघे जेरबंद

म्हापसा पोलिसांनी केली कारवाई

दैनिक गोमन्तक

पेडे येथे दिनांक 1 सप्टेंबर रोजी पूजा केदार रायकर यांचे घर फोडत अज्ञात चोरट्यांनी घरातील मौल्यवान ऐवज लांबवले होते. याबाबतची तक्रार पूजा रायकर यांचे वडिल पुरुषोत्तम पेडणेकर यांनी दिली होती. म्हापसा पोलिसांनी तक्रार दाखल होताच तपास सुरु करत आज दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. (Mapusa police arrest Sahil Isk Razak and Aslam Mujawar in Peddem theft)

मिळालेल्या माहितीनुसार पेडे, बार्देश येथे पूजा केदार रायकर यांचे घर 1 सप्टेंबर रोजी रात्री दोन वाजता चोरट्यांनी फोडले. यावेळी चोरट्यांनी घरातील मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम लांबवली होती. याबाबतची तक्रार 2 सप्टेंबर रोजी पुरुषोत्तम पेडणेकर यांनी म्हापसा पोलिसात केली होती.

घटनास्थळावरुन माहिती घेत पोलिसांनी तपास सुरु केला. याला आता यश आले असून या चोरीत साहिल इस्क सायनावाले, वय 22 रा. बार्देश तसेच रझाक अस्लम मुजावर, वय 23 रा. बार्देश या दोघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपींवर महाराष्ट्र, गोवा येथील गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी संशयितांकडून चांदीचे दागिने, नेकलेस, मनगटी घड्याळ रोक रक्कम जप्त केली आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक शोबित सक्सेना यांच्या देखरेखीखाली व मार्गदर्शनाखाली पार पडली तसेच पोलिस निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपासावर लक्ष ठेवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील 'त्या' भीषण अपघातात अखिल भारतीय सॅपेक टॅकरो असोसिएशनचे अध्यक्ष आणि वरिष्ठ खेळाडुचा मृत्यू

Pakistan Supreme Court Blast: पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा धमाका! 12 जण गंभीर जखमी; स्फोटाचे नेमके कारण काय?

Yashasvi Jaiswal Century: दक्षिण आफ्रिकेची 'डोकेदुखी' वाढली! कसोटी मालिकेपूर्वी यशस्वी जयस्वालचा 'मास्टरस्ट्रोक', ठोकलं शानदार शतक

Horoscope: मालामाल व्हा! कार्तिक पौर्णिमेला राशीनुसार दान करा 'या' वस्तू; देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल

Goa Police: कायदा हातात घ्याल तर याद राखा; गोवा पोलिस महासंचालकांची क्लब मालकांना तंबी

SCROLL FOR NEXT