वास्को: युनायटेड टॅक्सीमेन युनियनच्या दाबोळी विमानतळावरील काळ्या पिवळ्या टॅक्सी ऑपरेटर्सच्या गटाने बेकायदेशीरपणे टॅक्सी भाडे हडप करून बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्या हायजॅकर्सचा निषेध केला. दाबोळी विमानतळ परिसरात पोलिस गस्त वाढवून अशा हायजॅकर्सवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी काळ्या पिवळ्या टॅक्सी चालकांनी केली. (Dabolim Airport taxi drivers complaint against illegal passenger transporters)
दाबोळी विमानतळावरील टॅक्सी चालकांचा प्रश्न सोडविण्यास दाबोळी विमानतळ प्राधिकरण तसेच दाबोळी पोलिस व लोकप्रतिनिधी अपयशी ठरले असल्याचे आज पुन्हा सिद्ध झाले आहे. येथील काळ्या पिवळ्या टॅक्सी चालकांच्या अनेक समस्या त्यांना भेडसावत आहे. अशा समस्या अनेक वेळा लोकप्रतिनिधींकडे, सरकार दरबारी मांडल्या आहेत. पण आजपर्यन्त त्यावर तोडगा काढण्यास यंत्रणा अपयशी ठरली आहे. मुख्य प्रश्न काळ्या पिवळ्या टॅक्सी चालकांना भेडसावत आहे तो हायजॅकर्सचा जे चोरट्या मार्गाने दाबोळी विमानतळावरील बेकायदेशीरपणे भाडे हडप करून व्यवसाय करत आहे.
दरम्यान आज दाबोळी विमानतळावरील सुमारे 350 काळ्या पिवळ्या टॅक्सी व्यवसायिकांनी एकत्र येत बेकायदेशीररित्या चोरट्या मार्गाने टॅक्सी भाडे हडप करून व्यवसाय करणाऱ्या हायजॅर्सचा निषेध व्यक्त केला. हायजॅकर्सची दादागिरी वाढत असल्याचा ठपका दाबोळी विमानतळावरील टॅक्सी ऑपरेटर्सनी ठेवला आहे. युनायटेड टॅक्सीमेन यूनियनचे सचिव प्रसाद प्रभूगावकर यांनी बोलताना सांगितले की, दाबोळी विमानतळावर बेकायदेशीररित्या भाडे मारणाऱ्या हायजॅकर्सची संख्या वाढत असून त्यांची दादागिरीही वाढली आहे.
येथील कायदेशीर व्यवसाय करणाऱ्या काळा पिवळ्या पेक्षा चालकांवर कुरघोडी करण्याचे प्रकार हायजॅकर्सकडून घडले आहेत. आता पर्यटन हंगाम सुरू होणार असल्याने हायजॅकर्सनी आपले बस्थान दाबोळी विमानतळ परिसरात ठोकून बेकायदेशीररिया भाडे हडप करण्याचा घाट रचला आहे. त्यावर आळा घालणे गरजेचे असल्याचे सचिव प्रभूगावकर यांनी सांगितले.
रेंट अ कार व्यवसायिकही आपल्या रेंट कार दाबोळी विमानतळ परिसरात 24 तास उभ्या करून बेकायदेशीर भाडे मारत आहे. नियमानुसार रेंट कार व्यावसायिकांनी त्यांच्या कार्यालयाकडे आपली रेंट कार ठेवून भाडे मारणे क्रमप्राप्त आहे. मात्र हे व्यावसायिक 24 तास आपल्या कार दाबोळी विमानतळावर ठेवून भाडे हडप करत असल्याचे काळ्या पिवळ्या टॅक्सी चालकांनी सांगितले.
दाबोळी विमानतळावर पोलिस स्थानकात तक्रार केल्यास मनुष्यबळ कमी असल्याचे सांगण्यात येते. तेव्हा पोलिस संख्या वाढवून बेकायदेशीर भाडे मारणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी युनायटेड टॅक्सी युनियनच्या दाबोळी विमानतळावरील सुमारे 350 काळ्या पिवळ्या टॅक्सी ऑपरेटर्सनी केली आहे. अन्यथा रस्त्यावर ठाण मांडून आंदोलन छेडू असा इशारा टॅक्सी ऑपरेटर्सने दिला आहे.
दरम्यान दाबोळी विमानतळावर बेकायदेशीररित्या प्रवासी भाडे मारताना वास्को पोलीस स्थानकाच्या होमगार्डला पर्यटन विभागाच्या कलमा अंतर्गत होमगार्ड सय्यद दाऊद इस्माईल इब्राहिम (35) याला 5000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. परवाना नसताना खाजगी वाहनाने भाडे उचलल्याबद्दल सय्यद इस्माईल यांच्या विरोधात दाबोळी विमानतळावरील पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.