Mapusa Bus Stand Fencing Dainik Gomantak
गोवा

Mapusa Bus Stand: 'आमचा व्यवसाय बंद पडेल'! म्हापसा कदंब बसस्थानकाभोवती कुंपणास दुकानदारांचा आक्षेप; मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

Mapusa Bus Stand Fencing: दुकानदारांनी दावा केला आहे की, आमची दुकाने म्हापसा कदंब बसस्थानकाला तोंड करून आहेत. त्यामुळे ग्राहक थेट आमच्या दुकानापर्यंत पोहचू शकतात.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवावर नियंत्रणासाठी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, कदंब परिवहन महामंडळाने म्हापसा येथील जुन्या कदंब बसस्थानकाच्या सीमेच्या सभोवताली तारेचे कुंपण घालण्याचे योजिले आहे. मात्र, या निर्णयाला बसस्थानकाच्या शेजारील पालिका इमारतीमधील दुकान भाडेकरूंनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

हे कुंपण उभारल्यास त्याचा आमच्या उपजीविकेवर थेट परिणाम होईल, असा दावा त्यांनी केला आहे. जवळपास ४० कुटुंबीयांना या कुंपणाचा फटका बसू शकतो, असे या दुकानदारांचे म्हणणे आहे.

याविषयी संबंधित दुकानदारांनी म्हापसा पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. तसेच येत्या उद्या (ता. ५) दुकानदार स्थानिक आमदार तथा उपसभापती जोशुआ डिसोझा यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान, केटीसीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. ३) येथील बसस्थानकावर येऊन पाहणी केली असता संबंधित दुकानदारांनी अधिकाऱ्यांसमोर आपली कैफीयत मांडली. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत आहोत.

दुकानदारांनी दावा केला आहे की, आमची दुकाने म्हापसा कदंब बसस्थानकाला तोंड करून आहेत. त्यामुळे ग्राहक थेट आमच्या दुकानापर्यंत पोहचू शकतात. परंतु, सहा फूट उंचीचे तारेचे कुंपण उभारल्यास आमच्या आस्थापनांची दृश्यमानता रोखली जाईल. तसेच ग्राहकांना प्रवेश करण्यास गंभीरपणे प्रतिबंधित केले जाईल. यामुळे आमचे व्यवसाय प्रभावीपणे ठप्प होतील, असा दावा त्यांनी केला आहे.

भटक्या कुत्र्यांना रोखण्यासाठी उपाय

दरम्यान, भटक्या कुत्र्यांचे सामान्य नागरिकांवर होणार हल्ले तसेच वाढत्या घटनांची गंभीर नोंद मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाने घेतली होती. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणांवरून सर्व भटक्या कुत्र्यांना तातडीने हटवावे. तसेच भटक्या कुत्र्यांचा प्रवेश रोखण्यासाठी बस थांबे, बस आगार, शाळा-महाविद्यालये, रुग्णालये, रेल्वे स्थानके परिसराच्या सभोवताली तारेचे कुंपण घाला, असा आदेश दिला होता.

‘न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही’

कदंब वाहतूक महामंडळाकडून (केटीसी) कुंपण घातले जाणार आहे. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी तसेच सुप्रिम कोर्टाच्या मार्गदर्शनानुसार ही कार्यवाही होत असल्याचे केटीसी अधिकाऱ्यांचे मत आहे. या ठिकाणी केटीसी एक मीटरचे, केवळ चारच गेट काही अंतरावर ठेवतील. परंतु आपत्कालीन वेळेस तसेच दुकानातील माल नेताना या कुंपणाचा आम्हाला त्रास होईल. याशिवाय या निर्बंधामुळे ग्राहक दुकानावर थेट कसे येतील? असा सवाल दुकानदारांनी उपस्थित केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT