

बार्देश: म्हापसा येथील न्यायालयाजवळ असलेली कोमुनिदाद प्रशासक वारसा इमारत कमकुवत झाली असून एखादी अप्रिय घटना घडण्यापूर्वी ही इमारत दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
या इमारतीला अॅडमिनिस्ट्रीट ऑफ कोमुनिदाद या नावानेही ओळखले जाते. ही पोर्तुगीज काळातील इमारत असून १३०० चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेली आहे. या इमारतीत अनेक खोल्या, सभागृह आदींचा समावेश आहे. या इमारतीला सध्या तडे गेले आहेत. छताचे सिमेंट खाली पडत असून आतील सळ्या बाहेर दिसत आहेत.
उत्तर गोव्याचे प्रशासकीय कार्यालय हे उसगावसह उत्तर गोव्यातील ७५ कोमुनिदाद हाताळत आहेत. अतिक्रमण व इतर कोमुनिदादसंदर्भात सरासरी सुमारे ५० ते ६० तक्रारी प्राप्त होतात. है कामकाज हाताळण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने दैनंदिन कामकाजात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या इमारतीतील दूरध्वनी विभाग आणि इतर कार्यालये या आधीच येथून इतरत्र स्थलांतर झाली आहेत.
शासनाकडून दखल नाही
इमारतींच्या दुरुस्तीबाबत कोमुनिदादच्या प्रशासक कार्यालयाने शासनाला अनेक पत्रे पाठवली, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही.
दुरुस्तीचा प्रस्ताव अडकला लालफितीत
या इमारतीच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सरकारी लालफितीत अडकून आहे. २०२० साली सार्वजनिक बांधकाम खात्याने दुरुस्तीसाठी ५३ लाख ३१ हजार रुपयांना तांत्रिक मान्यता दिली होती. त्यानंतर २०२१ साली ५७ लाख १७ हजार रुपये दुरुस्तीसाठी मंजुरी दिली होती.
मात्र संबंधित कंत्राटदाराने ज्यादा रकमेत निविदा दाखल केल्या, त्यामुळे प्रक्रिया रद्द करून नव्याने दुरुस्तीसाठी खर्च निश्चित करून प्रशासकीय मंजुरीसाठी ५ मे २०२३ रोजी पाठव होता; पण अद्याप मंजुरी मिळालेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.