Mapusa Palika  Dainik Gomantak
गोवा

Mapusa Palika : म्हापसा पालिका परिक्षेत्रातील मालमत्तांचे सुडातर्फे मूल्यांकन

सरकारने राज्यातील सर्व पालिका परिक्षेत्रातील कर मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa : येथील नगरपालिका परिक्षेत्रातील मालमत्तांची कर मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया गोवा राज्य नागरी विकास एजन्सीतर्फे (सुडा) हाती घेतली आहे. यासंदर्भात म्हापसा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सार्वजनिक नोटीस जारी केली आहे.

सरकारने राज्यातील सर्व पालिका परिक्षेत्रातील कर मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला होता. याविषयीची जबाबदारी ही सुडावर सोपवली होती. त्यानुसार सुडाने कोलबो ग्रुप प्रा. लि. या कंत्राटदार कंपनीवर हे मूल्यांकन सर्व्हेक्षणाचे काम सोपवले आहे.

यासंदर्भात संबंधीत कंपनीच्या सर्व्हेक्षण कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे दिली आहेत. या मोहिमेअंतर्गत येणाऱ्या वरील कंपनीच्या कर्मचारी वर्ग हे मोजमाप, फोटो आणि इतर माहिती घेण्यासाठी येतील. त्यांना वस्तुस्थिती आणि सत्य माहिती द्यावी लागणार आहे. फॉर्म डी, मालमत्ता कर आणि पाणी बील, व्यवसाय परवाना ओळखपत्र व इतर माहिती द्यावी लागेल.

नियमानुसार कर आकारणी

कागदपत्रांची मूळ पत्र सादर न केल्यास नियमांनुसार उपलब्ध माहितीच्या आधारे मालमत्ता उदाहरणार्थ इमारत, दुकान, बंगला, वैयक्तिक घर यांना कर लागू केला जाईल. सर्व्हेक्षणानुसार मालमत्ता धारकांना कर आकारणी बंधनकारक राहिल. त्याविषयी कुठेही आव्हान करण्यास मिळणार नाही. करदात्यांच्या हितासाठी राबवल्या जाणाऱ्या या कर मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकनाची सर्व्हेक्षण प्रक्रियेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन म्हापसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी या सार्वजनिक नोटिशीद्वारे केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT