Mapusa Fire Brigade 
गोवा

Mapusa Fire Brigade: 45 फूट खोल विहीरीत पडलेल्या ऑस्ट्रेलियन पर्यटकाला जीवदान; म्हापसा अग्निशमन दलाची कामगिरी

म्हापसा अग्निशमन दलाचे जवान प्रवीण गावकर यांनी शर्तीचे प्रयत्न करून पर्यटकाला विहीरीबाहेर काढले

Kavya Powar

वागातोरमध्ये रस्त्यावरून चालत जाताना एक ऑस्ट्रेलियन पर्यटक चुकून तिथल्या विहिरीत पडल्याची धक्कादायक घटना समोर आली. म्हापसा अग्निशमन दलाचे जवान प्रवीण गावकर यांनी शर्तीचे प्रयत्न करून या पर्यटकाला विहीरीबाहेर काढून त्याचा जीव वाचवला.

डॅनियल ल्यूक (29) असे पर्यटकाचे नाव आहे. सदर घटना आज (5 डिसेंबर) पहाटे ३.३०च्या सुमारास घडली. त्यामुळे गावकर यांच्यावर सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, डॅनियल ल्यूक हा आपल्या इतर काही मित्रांसोबत हॉटेलच्या खोलीवर जात असताना अचानक तोल जाऊन तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या विरीहित पडला. ही विहीर 45 फूट खोल असून ती पाण्याने भरली होती. जवानांनी त्याला लाईव्ह जॅकेट तसेच दोरीच्या सहायाने बाहेर काढले. यात त्याला कुठलीही दुखापत झाली नाही.

म्हापसा अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर दलाचे उपअधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण नाईक गावकर, वासुदेव ताटे, लविंदर साळगावकर, आकाश कळंगुटकर आणि नितीन चोडणकर या जवानांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. त्यांनतर प्रवीण नाईक गावकर यांनी पथकातील अन्य जवानांच्या सहाय्याने त्या नागरिकाला सुखरूप बाहेर काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT