Goa Update 05 December: गोव्यातील दिवसभरातील घडामोडींवर एक नजर...

Goa News 05 December 2023: प्रत्येक नागरिकाने प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घ्यावे - आरोग्यमंत्री विश्वजित राणे
Goa Live Update 05 December 2023
Goa Live Update 05 December 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

प्रत्येक नागरिकाने प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घ्यावे - आरोग्यमंत्री विश्वजित राणे; वाळपईत प्रथमोपचार कार्यशाळेचा समारोप

समाज आणि राष्ट्राप्रतीचे कर्तव्य म्हणून ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ प्रत्येक सुजाण नागरिकाने घेतले पाहिजे. प्रत्येक नागरिकाने प्रथोमपचारक होणे गरजेचे आहे, त्यासाठीच संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात 'सीपीआर' मोहीम राबविली जात आहे, अशी माहिती आरोग्यमत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

वाळपईत प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. एकुण 100 जणांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. सहभागींना प्रशस्तिपत्र देण्यात आले.

गोव्यात या वर्षाच्या अखेरिस होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हल विरोधात आता हणजुणच्या जैव विविधता समितीने पंचायत कार्यालयात तक्रार केली आहे. त्यामुळे सनबर्नला सर्व पातळ्यांवर विरोध सुरू झाला आहे.  

गोवा सरकारतर्फे 6 डिसेंबरला राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा, सामाजिक कल्याणाच्या योजनांवर स्पर्धा आधारित

गोव्याच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याने (डीआयपी) बुधवारी 6 डिसेंबर रोजी राज्यस्तरीय इंटर हायर सेकंडरी क्विझ कॉम्पीटिशनचे आयोजन केले आहे. पणजीतील इन्स्टिट्युट मिनेझिस ब्रॅगान्झा हॉल येथे ही स्पर्धा होणार आहे. गोवा सरकारच्या समाज कल्याणाच्या योजना असा या स्पर्धेचा विषय असणार आहे.

5 व्या युथ नॅशनल चॅम्पियनशिप टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याला सुवर्णपदक

17 वर्षांखालील 5 व्या युथ नॅशनल चॅम्पियनशिप टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोवा संघाने सुवर्णपदक पटकावले. या संघाला विराज गावकर, जय खारबे यांचे मार्गदर्शन लाभले. योगेश राणे हे या संघाचे व्यवस्थापक आहेत. तसेच संघाला गोवा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पंकज सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.

मिचुआंग चक्रवादळामुळे गोव्याच्या फ्लाईट्सवरही परिणाम; 20 फ्लाईट्स विलंबाने

आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकलेल्या मिचुआंग चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टीवरील महत्वाच्या विमानतळांवरील फ्लाईट्सवरदेखील परिणाम झाला आहे. चेन्नई विमानतळावरील कामकाज विस्कळीत झाले आहे.

तसेच गोव्यातील दाबोळी आणि मोपा या विमानतळांवरील विमान उड्डाणांवरही परिणाम झाला आहे.

डिचोलीतील घरफोडी प्रकरणी एका संशयित चोरट्यास दिल्लीत अटक. दीपकुमार श्रीवास्तव असे संशयित चोरट्याचे नाव. अन्य दोघांचा हात असल्याचा संशय. गेल्या नोव्हेंबर महिन्यात साष्टीवाडा-बोर्डे येथे मिलिंद शिरोडकर यांच्या बंगल्यात झाली होती चोरी.

महामार्ग विस्तारीकरण अलाइनमेंटला बोरी ग्रामस्थांचा विरोध 

बोरी ग्रामस्थांनी महामार्ग विस्तारीकरण अलाइनमेंटला विरोध दर्शविला आहे. भूसंपादनाबाबत स्पष्टता नसल्याचा आरोप. नागरिकांची घरे, शेततळे, झाडे, मंदिरे जाण्याची भीती. विस्तारीकरणाला विरोध नाही अलाइनमेंटला असल्याची ग्रामस्थांची प्रतिक्रिया.

होंडा-सत्तरी येथे कारला क्रेनची धडक

होंडा-सत्तरी येथील रस्त्यावर पार्क केलेल्या दोन कारला क्रेनची धडक बसली. यामध्ये कारचे नुकसान झाले. क्रेन चालकाला पोलीस स्थानकात नेण्यात आले आहे. दरम्यान यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही

खोल विहीरीत पडलेल्या ऑस्ट्रेलियन पर्यटकाला जीवदान

वागतोरमध्ये विहिरीत पडलेल्या 29 वर्षीय ऑस्ट्रेलियन पर्यटकालास अग्निशमन दलाने दिले जीवदान. जवान प्रवीण नाईक गावकर यांनी पर्यटकाला 45 फूट खोल विहीरीतून सुखरून बाहेर काढले.

गुन्हे अन्वेषण शाखेच्या छाप्यात एक ब्रिटिश नागरिक अटक

गुन्हे अन्वेषण शाखेने ओझर येथे छापा टाकून जॉन पार्किन्सन या ब्रिटिश नागरिकाला अटक केली. त्याच्यावर १५ लाख किंमतीचे १.९१४ ग्रॅम एलसीडी पेपर्स व ४.३५३ ग्रॅम एलसीडी लिक्विड बाळगल्याचा आरोप आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com