Mapusa Roof Collapse Dainik Gomantak
गोवा

VIDEO: बापरे! वीज कार्यालयातील छताचा भाग कोसळला खाली; म्हापशातील घटनेने चिंतेचे वातावरण

Mapusa Roof Collapse: वीज खाते कार्यालयातील छताचा एक भाग कोसळल्याची घटना घडली असून, ढिगारा कार्यालयातील प्रिंटरवर पडल्याचे वृत्त आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: येथील वीज खाते कार्यालयातील छताचा एक भाग कोसळल्याची घटना घडली असून, ढिगारा कार्यालयातील प्रिंटरवर पडल्याचे वृत्त आहे. या इमारतीची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, अनेक ठिकाणी पडझड झाल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर इमारत ४० वर्षे जुनी असून, या इमारतीची स्थिती खूपच कमकुवत आहे. ​इमारतीची स्थिती धोकादायक असूनही सरकारी कर्मचारी तिथे आपला जीव मुठीत धरून काम करत आहेत. सुदैवाने, या घटनेत जीवितहानी झालेली नाही.

मात्र, ‘जर हा स्लॅबचा भाग कर्मचाऱ्यांवर पडला असता, तर त्याला जबाबदार कोण असते, असा संतप्त सवाल केला जात आहे.

लवकरच इमारत सोडू

याविषयी कार्यकारी अभियंते सुभाष पार्सेकर म्हणाले की, खरं तर इमारतीचा स्लॅब कोसळला नाही, तर फॉल्स सीलिंगमधील काही सिमेंटचे तुकडे पडलेत. गेल्या ३ ते ६ महिन्यांपासून आम्ही ही इमारत रिकामी करण्याचा प्रयत्न करत आहोत. इमारतीची स्थिती माहीत आहे. लवकरच ही इमारत सोडू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

Goa NCRB Crime Report: "नारी शक्ती वंदन" फक्त नावापुरतेच? एनसीआरबी अहवालावरुन काँग्रेसचा सावंत सरकारवर हल्लाबोल, गोव्यात सुशासनाचा दावा फोल

Chorla Ghat Accident: चोर्ला घाटात धडक देऊन पळ काढणारी बस डिचोलीत रोखली, तरुणांनी दाखवला इंगा; मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा

SCROLL FOR NEXT