Chorla Ghat Accident: चोर्ला घाटात धडक देऊन पळ काढणारी बस डिचोलीत रोखली, तरुणांनी दाखवला इंगा; मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा

Karnataka Bus Hit And Run: ‘हिट ॲण्ड रन’प्रकरणी कर्नाटकच्या हद्दीतून पळ काढलेल्या प्रवासी बसचा काही युवकांनी पाठलाग करून ती डिचोलीत अडविली.
Chorla Ghat Accident
Karnataka Bus Hit And RunDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: ‘हिट ॲण्ड रन’प्रकरणी कर्नाटकच्या हद्दीतून पळ काढलेल्या प्रवासी बसचा काही युवकांनी पाठलाग करून ती डिचोलीत अडविली. मात्र, अपघाताचे प्रकरण मिटेपर्यंत बसमधील प्रवासी तीन तासांहून अधिक काळ मध्यरात्रीपर्यंत वाटेतच अडकून पडले.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक वाहतूक महामंडळाची प्रवासी बस गुरुवारी सायंकाळी खानापूर डेपोतून चोर्ला घाटमार्गे गोव्यात येत होती. ही बस पणजीला जाणार होती. कर्नाटक राज्याच्या हद्दीत चोर्ला घाटाच्या माथ्यावर या बसने ओव्हरटेक करताना एका टीप्परला निसटती धडक दिली. या धडकेत टीप्परची काच आणि इतर काही भागांची मोडतोड झाली. अपघातानंतर चालकाने त्याठिकाणी न थांबता बससह पळ काढला.

Chorla Ghat Accident
Goa Crime: किरकोळ भांडणातून शेजाऱ्यांमध्ये हाणामारी ; खोर्ली-म्हापशात शाब्दिक वाद विकोपाला; एक गंभीर जखमी

टीप्परचालकाने मोबाईलवरून मालकासह आपल्या मित्रांना या प्रकाराची माहिती दिली. नंतर या बसचा पाठलाग सुरू झाला. अखेर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास डिचोलीतील वाठादेव जंक्शनवर ही बस अडविण्यात आली. बस अडविलेल्या युवकांनी अपघातग्रस्त टीप्परची झालेली मोडतोड दाखवण्यासाठी बसचालकाला त्यांच्या गाडीतून नेले.

Chorla Ghat Accident
Goa Crime: मडगावातील दोन वर्षांपूर्वीच्या बलात्कार प्रकरणाचा उलगडा; संशयितावर गुन्हा दाखल!

महिला प्रवाशांचे अतोनात हाल

टीप्परची परस्परांनी पाहणी केल्यानंतर अपघाताचे हे प्रकरण आपापसांत मिटविले. तोपर्यंत मध्यरात्र झाली होती. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत बसमधील प्रवासी अडकून पडले. त्यात महिला मोठ्या संख्येने होत्या. गोव्यातील प्रवाशांनी मात्र मिळेल त्या वाहनाने घर गाठले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com