Goa NCRB Crime Report: "नारी शक्ती वंदन" फक्त नावापुरतेच? एनसीआरबी अहवालावरुन काँग्रेसचा सावंत सरकारवर हल्लाबोल, गोव्यात सुशासनाचा दावा फोल

Goa NCRB crime report 2024: राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्यूरोने (एनसीआरबी) जाहीर केलेल्या देशातील गुन्हेगारीच्या ताज्या अहवालात बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये गोवा देशात अव्वल असल्याचे नोंदविण्यात आले आहे.
Goa NCRB Crime Report
cm pramod sawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्यूरोने (एनसीआरबी) जाहीर केलेल्या देशातील गुन्हेगारीच्या ताज्या अहवालात बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये गोवा देशात अव्वल असल्याचे नोंदविण्यात आले आहे. या नोंदीवरून काँग्रेसने राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजप सरकारसाठी ही लाजिरवाणी आणि धक्कादायक बाब असल्याचे काँग्रेसच्या प्रसारमाध्यम विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

या पत्रकात पुढे म्हटले आहे की, महिलांच्या सुरक्षेशी गंभीर तडजोड होत असताना सरकार मात्र प्रतिमा व्यवस्थापन आणि जाहिरातबाजीमध्ये व्यस्त आहे. एनसीआरबी अहवालानुसार २०२४ मध्ये गोव्यात १०५ बलात्कार प्रकरणे आणि महिलांच्या पाठलागासंदर्भातील १९ एफआयआर नोंदविण्यात आले असून, बलात्कार गुन्हेगारी दरात गोवा देशात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. हे आकडे केवळ सांख्यिकीय माहिती नसून भाजप सरकारच्या अपयशी कारभारामुळे महिलांमध्ये वाढत चाललेली असुरक्षितता, भीती आणि प्रशासनाच्या अपयशाचे प्रतीक असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

Goa NCRB Crime Report
Goa Crime: मडगावातील दोन वर्षांपूर्वीच्या बलात्कार प्रकरणाचा उलगडा; संशयितावर गुन्हा दाखल!

‘महिला सक्षमीकरण’, ‘नारी शक्ती वंदन’, ‘सुशासन’ आणि ‘सबका साथ, सबका विश्वास’ अशा घोषणा भाजप सरकार सातत्याने देते; मात्र गोव्यातील वास्तव पूर्णपणे वेगळे आहे. महिलांना सुरक्षा, सन्मान आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास मिळणे आवश्यक आहे; मात्र भाजप सरकारच्या काळात तो विश्वास ढळला असल्याचे स्पष्ट होत आहे.

Goa NCRB Crime Report
Goa Crime: मडगाव ज्वेलर्स हत्या प्रकरणात 'ओंकार'ला सहा वर्षांनंतर सशर्त जामीन; खटल्याच्या विलंबाचा आरोपीला फायदा

‘एनसीआरबी’ची आकडेवारी भाजपच्या (BJP) शासन पद्धतीचे कठोर वास्तव उघड करते. अमली पदार्थांचे वाढते प्रमाण, महिलांवरील वाढते गुन्हे, सायबर फसवणुकीचे प्रकार आणि वाढती अराजकता यामुळे गोव्याच्या प्रतिमेला धक्का बसत असतानाही भाजप सरकार मात्र केवळ कार्यक्रमांच्या आयोजनात आणि प्रसिद्धी मिळवण्यातच मग्न आहे. प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे; उत्तरदायित्वाचा लवलेशही उरलेला नाही आणि गुन्हेगार पूर्वीपेक्षाही अधिक निर्धास्त झाल्याचे दिसून येत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या या संपूर्ण अपयशापेक्षा गोवा नक्कीच अधिक चांगल्या प्रशासनास पात्र आहे.

- दुर्गादास कामत, सरचिटणीस, गोवा फॉरवर्ड

Goa NCRB Crime Report
Goa Crime: बंद खोलीत आढळला उत्तर प्रदेशच्या तरुणाचा मृतदेह, कुंकळ्ळीत उडाली खळबळ; पोलिसांनी नाकारला घातपाताचा संशय

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. २०२४ मधील सरकारचा १७.१ टक्के दोषारोप सिद्धी दर आणि देशात सर्वाधिक बलात्काराचे प्रमाण गोव्यात नोंदले जाणे, हे कायद्याच्या कमकुवत अंमलबजावणीचे आणि पोलिसांवरील जनतेचा घटता विश्वास दर्शवते. राज्यातील गुन्हेगारी जगतातील काही घटक व अधिकारी यांच्यातील संगनमतही दिसून येते.

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com