Dashrath Madgaonkar gomantak
गोवा

Mapusa News: सेंद्रिय शेतीद्वारे मधमाशी पालन !

गोमन्तक डिजिटल टीम

योगेश मिराशी

Mapusa News : मधमाशीपालन सध्या काळाची गरज बनली आहे. कारण पृथ्वीवरून मधमाशांचा नायनाट झाल्यास मानवी जीवनसुद्धा धोक्यात येईल.

त्यासाठी मधमाशीपालन हा एक शेतीस पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी जोपासला आहे आणि त्यादृष्टीने बार्देशातील अनेक शेतकऱ्यांनी तसा प्रयोग करण्यास सुरूवातही केली आहे.

या प्रयोगाअंतर्गत पेअरसेतवाडो-गिरी, म्‍हापसा येथील शेतकरी दशरथ मडगावकर हे सेंद्रीय शेतीपासून मधमाशीपालन हा जोडव्यवसाय करीत आहेत.

मधमाशीपासून तयार होणाऱ्या पदार्थांचा मानवी जीवनात खूप मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे, मधमाशीमुळे पिकांमध्ये परागीकरण होत असते.

त्यामुळे शेतकऱ्यांच्‍या उत्पन्नात वाढ होते. याच दृष्‍टिकोनातून कृषी खात्याच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सीकडून (आत्मा) शेतकऱ्यांना मधमाशी पालनासाठी प्रोत्साहन दिले जाते.

या व्‍यवसायासाठी शासकीय स्तरावर अनुदानही उपलब्ध करून दिले जाते. याच अनुदानातून बार्देशातील शेतकऱ्यांनी ‘बार्देश बी-कीपर सोसायटी’अंतर्गत नोंदणी करून आपला स्वतःचा गट स्थापन केलाय.

जवळपास ३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना ‘आत्मा’ने हे मधमाशीपालनसाठी मधपेट्या व इतर मधोद्योग साहित्य उपलब्ध करून दिले आहे. याबाबत बोलताना शेतकरी शरथ मडगावकर (६७) यांनी सांगितले की, माझ्‍या कुटुंबाचा उदारनिर्वाह शेतीव्यसायातून चालतो.

‘आत्मा’कडून आम्हाला मधमाशीपालन योजनेसंदर्भात माहिती मिळाली. पहिल्यांदाच प्रयोग केला तेव्हा अपेक्षित यश मिळाले नाही.

त्यानंतर पी. सॅलियो यांच्याकडून आम्ही प्रशिक्षण घेतले. त्यानुसार, यंदा मार्चमध्ये आम्ही मधमाशीपालन प्रयोगास नव्याने सुरूवात केली. संपूर्ण पेट्या भरून आम्हाला सप्टेंबरपर्यंत मध मिळण्यास सुरूवात होईल.

दशरथ मडगावकर हे भाजीपाला व भातशेती व्यवसाय करतात. मधमाशीपालन हा त्‍यांचा जोडधंदा आहे. मागील अकरा वर्षांपासून त्यांनी सेंद्रीय शेती लागवडीवर जास्त भर दिला आहे. यामध्ये ते ब्रोकोली, तांबडी भाजी, वांगी, कॅबेज, चिटकी, मिरच्या, वाल आदी पिके घेतात.

शिवाय कलिंगडचेही पीक काढतात. नंतर फलोत्पादन मंडळाकडे त्‍याची विक्री करतात. अनेकजण थेट त्यांच्या शेतात येऊन भाजीपाला खरेदी करतात.

मडगावकर यांना स्टार फार्मर व नॅचरल फार्मिंगसाठी दोनवेळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस देखील मिळाले आहे.

मधमाशी पालनामुळे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास उत्तम मदत होते. तसेच मधमाशा वनस्पतीच्या परागीकरण प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी जास्तीत जास्त मधमाशांचा सहभाग वाढवून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे.

एका पेटीत आठ फ्रेम्‍स तयार होतात. त्‍यात मधमाशा शिरतात व मध जमा करतात. या मधमाशांमध्ये एक राणी माशी असते. पर्यावरणाचे रक्षण करणे या उद्देशाने मी या उपक्रमाशी जोडलो गेलोय.

दशरथ मडगावकर, शेतकरी, गिरी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT