Goa Budget 2023-24: कसा असेल यंदाचा अर्थसंकल्प, मुख्यमंत्री सावंत म्हणतात...

करबदल, प्रशासकीय बदलांची संघटनांकडून मागणी
Goa Budget 2023-24
Goa Budget 2023-24Dainik Gomantak

Goa Budget 2023-24: येत्या अर्थंसकल्पीय अधिवेशनात सादर होणारा यंदाचा अर्थसंकल्प हा राज्यातील सर्व घटकांसाठी दिलासादायक ठरून सर्वसमावेश आणि स्वयंपूर्णतेवर बेतलेला असेल, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

अर्थसंकल्पावरील चर्चेच्या पूर्वतयारीच्या बैठकांची सत्रे सध्या सुरू आहेत. या दरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी विविध औद्यागिक, व्यावसायिक व इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी पणजी येथे चर्चा केली.

Goa Budget 2023-24
Mapusa Fire:...आणि धावत्या ट्रकच्या चाकांनी अचानक घेतला पेट, म्हापसा येथील रात्रीची घटना

‘आज चेंबर ऑफ कॉमर्स, टूर अँड ट्रॅव्हल्स, मायनिंग, फिशरी, ॲटोमोबाईल असोसिएशन, सुक्ष्म आणि लघु उद्योग, औद्योगिक, चार्टड अकांऊट, फार्मसी या संघटनांसह कृषी पणन मंडळ, गोवा बागायतदार, लिकर उद्योजक, पेट्रोल डिलर यांच्यासह इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.

प्रामुख्याने व्हॅट, जीएसटीमध्ये बदल, सध्याच्या योजनांत बदल, नव्या योजना सुरू करण्याची मागणी या पदाधिकाऱ्यांनी केली आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांच्या मागण्या आणि सुचनांचा विचार करून आगामी अर्थसंकल्पात बदल करण्यात येईल, जो राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचा असेल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

Goa Budget 2023-24
MLA Delilah Lobo: पर्यटकांना मारहाण ही अ‍ॅक्शनची रिअ‍ॅक्शन; कर्मचाऱ्यांची चूक नाही, पर्यटकांवरच गुन्हा नोंदवा!

आज मंत्रिमंडळाची बैठक

अर्थसंकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या संदर्भातील नव्याने करावे लागणारे बदल आणि सुचना याची माहिती मंत्रिमडळासमोर मांडून ते बदल केले जातील. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी मंत्रिमंडळाची बैठक बोलाविण्यात आली आहे. यावेळी अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख देखील निश्‍चित केली जाईल, असे सांगण्यात आले.

बैठकांचे सत्र सुरूच

गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी काही संघटनांसोबत संवाद साधला. मात्र, शुक्रवारीही बैठकांचे सत्र सुरूच राहणार असून मुख्यमंत्री उर्वरित प्रमुख असोसिएशन, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com