Mapusa Online Fraud : क्रिप्टो करन्सी व्यवहारातून तरुणाला 18 लाखांचा गंडा

सोशल मीडियावर ओळख वाढवून विश्‍वास संपादन करत केली फसवणूक
Online Fraud
Online FraudDainik Gomantak
Published on
Updated on

सोशल मीडियावर ओळख वाढवून विश्‍वास संपादन करत आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार आज समोर आला आहे. ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्याचे आमिष दाखवून खोर्ली-म्हापशातील तरुण व्यावसायिकाला अज्ञाताने 18 लाख 27 हजार रुपयांचा गंडा घातला.

या व्यवहारात क्रिप्टो करन्सीचा वापर झाल्याने तपासासाठी सायबर क्राईम विभागासमोर आव्हान निर्माण झाले आहे.

Online Fraud
वडिलांच्या भीतीने बिहारचा 10 वर्षीय मुलगा आला गोव्यात, बेपत्ता झाल्याची तक्रार दिली, अखेर 10 दिवसांनी...

तक्रारदार व्यावसायिकाला ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्यासाठी अज्ञाताने फेसबुकवरून आमिष दाखविले. झटपट पैसा मिळवून देण्याचे सांगत त्याला क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करायला लावली.

व्यावसायिकाने पैशांच्या आमिषाने तीन महिन्यांत विविध ॲपमधून एकूण 18 लाख 27 हजारांची गुंतवणूक केली. मात्र, परतावा मिळत नसल्याने त्याला संशय आला. त्याने अज्ञाताला संपर्क साधला असता कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. आपण फसवले गेलो आहोत, हे लक्षात येताच त्याने पोलिसांत धाव घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com