क्रीडामंत्री मनोहर आजगावकर (Manohar Ajgaonkar) दैनिक गोमन्तक
गोवा

पेडण्‍यात आम्‍हाला ‘बाबू’ नकोच

भाजपच्या कार्यक्रमात व्यासपीठावर असूनही साधे नावसुद्धा घेतले जात नाही. ज्‍या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवला, त्यांनाच जर मान सन्मान मिळत नसेल तर काय उपयोग?

दैनिक गोमंतक

मोरजी Morjim : या निवडणुकीत तरी पेडणे मतदारसंघातील भाजपची (BJP) उमेदवारी स्थानिक उमेदवाराला द्यावी, अशी मागणी पक्षाच्‍या ज्‍येष्‍ठ व मूळ कार्यकर्त्यांनी आज पेडणे शेतकरी सेवा सभागृहात घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत केली. दरम्‍यान, या मागणीमुळे सध्‍याचे आमदार (MLA) तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Manohar Ajgaonkar) यांच्यावर हे कार्यकर्ते नाराज असल्‍याचे पुन्‍हा स्‍पष्‍ट झाले आहे.

या पत्रकार परिषदेला माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, माजी भाजप मंडल अध्यक्ष कृशा गावडे, व्यंकटेश घोडगे, रोहिदास भाटलेकर, माजी सरपंच पंढरी आरोलकर, विश्वास नारोजी, जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, सुरेश केरकर, तुषार गडेकर, कल्पेश परब, दिगंबर आस्तेकर, पंच सत्यभामा पेडणेकर, राकेश स्वार, राधिका गडेकर, शिवानी परब, साबाजी शेट्ये, महेश च्यारी, वासू हळर्णकर, अजित प्रभू, दशरथ गवंडी, राजन वीर, बाबनी गडेकर, श्रीधर देसाई, गिरीश कामत, गजानन देसाई, तुळशीदास कवठणकर, प्रीतम कळंगुटकर, प्रभाकर महाले, वसंत देसाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्‍ही भाजपचे निष्‍ठावंत कार्यकर्ते आहोत. त्‍यामुळे विधानसभा निवडणुकीत आम्हाला पक्षाने स्थानिक उमेदवार द्यावा. त्‍याच्‍या विजयासाठी आम्‍ही एकजुटीने कार्य करू. आमची मागणी पूर्ण होईल असा आम्‍हाला विश्वास आहे.

मागणीसाठी केले होते लाक्षणिक उपोषण

स्थानिक उमेदवार मिळावा यासाठी पेडणे भाजपचे माजी मंडल अध्यक्ष दाजी कासकर यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्‍यात आले होते. या उपोषणानंतर पक्ष दखल घेऊन उमेदवारी जाहीर करेल अशी अपेक्षा होती. मात्र तसे काही घडले नाही. त्‍यामुळे आम्‍ही पत्रकार परिषद घेऊन आता आमच्या मागणीकडे पक्षाचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्‍या पाच वर्षांपासून भाजप कार्यकर्त्यांना कुणी वालीच उरला नाही. भाजपच्या कार्यक्रमात व्यासपीठावर असूनही साधे नावसुद्धा घेतले जात नाही. ज्‍या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढवला, त्यांनाच जर मान सन्मान मिळत नसेल तर काय उपयोग? म्‍हणूनच पक्षाने कार्यकर्त्यांचा मान राखून स्थानिक उमेदवार द्यावा अशी मागणी रमेश सावळ यांनी केली.

2012 च्या निवडणुकीनंतर पेडण्‍यात‍ स्‍थानिक उमेदवाराला तिकीट देणार असे आश्‍‍वासन माजी मुख्‍यमंत्री मनोहर पर्रीकर व पक्षाने आम्‍हाला दिले होते. पण 2017 च्या निवडणुकीतही आमच्‍या माथी ‘बाहेरचा’ उमेदवार लादला गेला. निदान आता तरी पक्षाने स्थानिक उमेदवार द्यावा. त्‍याला आमदार बनवण्याचे काम आमचे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT