रेल्वे दुपदरीकरणाचा निर्णय ममता बॅनर्जींचाच..
पणजी: रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचा (Two way Goa Railway Track) निर्णय तृणमूल काँग्रेसच्या (Goa TMC) अध्यक्षा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 2010 साली केंद्रीय रेल्वेमंत्री असताना घेतला होता. त्यामध्ये राज्यातील या दुपदरीकरणाचाही समावेश होता. त्यामुळे तृणमूल काँग्रेसचे गोवा प्रभारी खासदार महुआ मोईत्रा यांनी आरोप करण्यापूर्वी पार्श्वभूमी तपासावी, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी लगावला.
राज्यात रेल्वे मार्ग दुपदरीकरणाला विरोध होत आहे. त्यासंदर्भात बोलताना मोईत्रा यांनी या प्रकल्पाला भाजप सरकार(BJP) जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपाचे खंडन करताना तानावडे यांनी वरील स्पष्टीकरण केले. ते म्हणाले, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) रेल्वेमंत्री असताना देशातील 35 रेल्वे मार्गांच्या दुपदरीकरणाचा निर्णय झाला होता. त्यामध्ये गोव्यातील मार्गांचाही समावेश होता. आता निर्णयाची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे त्याला भाजप जबाबदार होत नाही तर तृणमूल काँग्रेसने घेतलेल्या निर्णयामुळे लोकांना लढा देण्याची वेळ आली आहे.
जुने गोवे येथील वारसास्थळ क्षेत्रातील बांधकामाबाबतचे परवाना मागे घेण्यात आले आहेत. जुने गोवे पंचायतीनेही परवाने रद्द केले आहेत. हे बांधकाम बेकायदा असल्यास पाडण्यात येईल, मात्र त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आहे. ज्यांनी आंदोलन सुरू केले आहे त्यांनी सदर बांधकाम जमीनदोस्त करण्यासाठी न्यायालयात जावे. कारवाई करण्यासाठी प्रत्येक अधिकारिणीची प्रक्रिया असते. त्यानुसार हे प्रकरण हाताळले जाईल. सदर बांधकामाशी भाजप सरकारचा काहीच संबंध नाही.
ज्या व्यक्ती जमीन विकत घेण्यापासून ते त्याची विक्री करण्यापर्यंत गुंतलेल्या आहेत तेसुद्धा तेवढेच जबाबदार आहेत, असे तानावडे म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.