Dr Ketan Bhatikar Congress joining Ponda Dainik Gomantak
गोवा

Ketan Bhatikar: 'डॉ. केतन भाटीकर कॉंग्रेसमध्ये दाखल'! फोंड्यात प्रवेश कार्यक्रम; माणिकराव ठाकरे, अंजली निंबाळकर, LOP आलेमाव यांची उपस्थिती

Ketan Bhatikar Congress joining Ponda: फोंड्यात मंगळवारी डॉ. केतन भाटीकर यांचा काँग्रेस प्रवेश कार्यक्रम झाला, त्यावेळेला माणिकराव ठाकरे बोलत होते.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: राज्यातील सत्तेवर असलेल्या भाजप सरकारला केवळ पैशांशी मतलब असून पैशांसाठी जमिनीविषयक कायदे बदलून लोकांकडून भाजपने लूट चालवली आहे, असा आरोप करून गोव्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असल्याचे काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.

फोंड्यात मंगळवारी डॉ. केतन भाटीकर यांचा काँग्रेस प्रवेश कार्यक्रम झाला, त्यावेळेला माणिकराव ठाकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केतन भाटीकर, काँग्रेसच्या नेत्या अंजली निंबाळकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, फोंड्यातील काँग्रेसचे नेते राजेश वेरेकर, फोंडा मंडळ अध्यक्ष विलियम आगियार तसेच इतर काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

माणिकराव ठाकरे म्हणाले की, भाजप सरकारच्या काळात गोव्याची हालत बेकार आहे. भाजपकडून केवळ पैसा पाहिला जातो, त्यामुळे आज राज्यात अराजक माजले आहे.

सगळीकडे आंदोलने होत आहेत, म्हणूनच गोव्यात भाजप दूर करून काँग्रेसला आणणे आवश्‍यक आहे, म्हणूनच केतन भाटीकर यांनी पक्ष प्रवेश केला असून सर्वांच्या संघटित प्रयत्नातून पक्ष मजबूत करूया.

अंजली निंबाळकर म्हणाल्या की, गोव्यात भाजप सरकारची हुकुमशाही चालली आहे. भाजपकडून जाती धर्माच्या नावावर राजकारण केले जात आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या काँग्रेसकडेच आता गोव्याची धुरा द्यायला हवी.

आमदार एल्टन डिकॉस्टा म्हणाले की, भ्रष्ट भाजपला घरी पाठवण्याची वेळ आली असून करोडो रुपये कमावणाऱ्या भाजपला आता धडा शिकवण्यासाठी एकसंध होऊया. अमित पाटकर यांनीही भाजप सरकारचे वाभाडे काढून सगळीकडे अराजक माजले असल्याचा आरोप केला.

राजेश वेरेकर म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीत फोंड्यात काँग्रेसला कार्यकर्त्यांनी समर्थ साथ दिली म्हणूनच आज काँग्रेसचे कार्य तळागाळात पोचत आहे. काँग्रेसची ही राजकीय नीती केतन भाटीकर यांनी अंगिकारावी. सूत्रसंचालन एम. के. शेख यांनी, विलियम आगियार यांनी स्वागत तर जॉन परेरा यांनी आभार मानले.

कॉंग्रेससोबत कायम राहणार!

केतन भाटीकर म्हणाले की, फोंड्याच्या पोटनिवडणुकीचा धसका भाजपने घेतला आहे, म्हणूनच तर मुख्यमंत्र्यांच्या फोंड्याला परत परत वाऱ्या चालल्या आहेत. आपण ‘मगो’ सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश करताना अफवा पिकवल्या गेल्या, मात्र त्यात काहीही तथ्य नसून सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या काँग्रेससोबत आपण कायम राहू, अशी ग्वाही भाटीकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT