Mandrem VP Sarpanch Amit Sawant Dainik Gomantak
गोवा

Mandrem Sarpanch : पद गेले तरी पर्वा नाही; मांद्रे पंचायत क्षेत्रात जुगाराला विरोधच

सरपंच अमित सावंत; पोलिसांनी कारवाई करावी

दैनिक गोमन्तक

Mandrem Sarpanch Adv. Amit Sawant : मांद्रे पंचायत क्षेत्रात कसल्याच प्रकारचा जुगार होऊ देणार नाही. जुगाराच्या विरोधात पेडणे पोलिसांना सरपंच या नात्याने आपण निवेदन सादर केलेले आहे. आता पेडणे पोलिसांनी मांद्रे पंचायत क्षेत्रामध्ये कुठे-कुठे जुगार चालू आहे? तो जुगार पूर्णपणे बंद करावा.

प्रसंगी आपले सरपंचपद गमावण्याची जरी वेळ आली तरी आपल्याला पर्वा नाही. परंतु मांद्रे पंचायत क्षेत्रात यापुढे जुगार नकोच; असा इशारा मांद्रेचे सरपंच ॲड. अमित सावंत यांनी दिला.

मांद्रे मतदारसंघात सध्या मोठ्या प्रमाणात जुगाराचे पेव आहे. ठिकठिकाणी जुगाराबरोबरच मटका बीट घेणेही चालू आहे. काही बीटवाले तर बसस्टॉपवर बसून बीट घेताना दिसत आहेत. त्यामुळे एखादा प्रवासी बससाठी जर त्या शेडमध्ये उभा राहिला तर त्याला राहता येत नाही.

पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे हे कार्यक्षम अधिकारी आहेत . त्यांनी आता कार्यवाही करावी, अशी मागणी अमित सावंत यांनी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही गॅम्बलिंगच्या विरोधात कडक पावले उचलणार असे जाहीर केले होते. त्याचेही आपण स्वागत करतो. त्यामुळे आता तेच योग्य पद्धतीने पावले उचलतील, असा विश्वास अमित सावंत यांनी व्यक्त केला.

नागरिकांच्या तक्रारी वाढल्या

सरपंच अमित सावंत यांनी सांगितले की, आपण सरपंच या नात्याने पेडणे पोलिसांना लेखी निवेदन सादर केले आहे. मांद्रे गावात जिथे-जिथे जुगार चालू असेल तो संबंधित विभागाने लवकरात लवकर बंद पाडावा. अनेक गावांतील नागरिक आणि महिलांच्या तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहेत. त्यामुळे आपल्यालाही पाऊल उचलावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: मोठमोठे खड्डे, अर्धवट रस्ते; म्हापशात वाहनचालकांची तारेवरची कसरत; पादचाऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

अग्रलेख: राजकारणाचे ‘घरपण’

Goa Rain: पुन्हा कोसळणार पावसाच्या धारा! गोव्याला 'शक्ती' वादळाचा धोका? मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

‘गृहमंत्री गोव्‍याच्‍या मूडवर बोलले, गुंडगिरीवर नाही'; युरींचे टीकास्त्र; काणकोणकर हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सांगे, कुंकळ्ळीत मेणबत्ती मोर्चा

RSS: 'महासत्तेसाठी संघ बनणार पंचप्राण'! CM सावंतांचे प्रतिपादन; गणवेषात विजयादशमी उत्सवात झाले सहभागी

SCROLL FOR NEXT