मांद्रे: साधारण तीन वर्षांपूर्वी मांद्रे येथील जुनसवाडा किनारी भागात लोखंडी पूल बांधून त्याचं इनोग्रेशन करण्यात आलं होतं. या लोखंडी पूलसाठी कोट्यवधी पैसे खर्च करण्यात आले होते. एवढे पैसे खर्च करून हा लोखंडी पूल बांधण्यात आला पण पूल बांधल्यापासून आतापर्यंत त्याची कोणीही देखरेख न केल्याने या लोखंडी पूलची परिस्थिती आता बिकट झालेली आहे.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी या पुलाची पायाभरणी केली होती. यानंतर दयानंद सोपटे काँग्रेसमधून भाजप पक्षात आले आणि वर्ष २०१९ मध्ये या पुलाचे काम पूर्ण झाले. मात्र सध्या या पुलाची म्हणावी तशी देखभाल केलेली नाही. उद्घाटन झाल्यापासून ते आतापर्यंत पुलाच्या कडेला लावलेल्या लाईट्स देखील पेटत नाहीयेत, म्हणूनच संबंधित अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी करून आवश्यक बदल करावेत अशी मागणी स्थानिक करतायत.
मांद्रे मतदारसंघाचे आमदार म्हणतात की, "रोहन खवंटे माझे मित्र आहेत" तर अशा स्थितीत मांद्रे जुनसवाडा येथे असलेल्या लोखंडी पुलाची देखरेख अजून का झालेली नाही? असा प्रश्न अमित सावंत यांनी केला.
गोवा सरकारकडून नेहमीच पर्यावरणाची काळजी घेत पर्यटनाला चलाना दिल्या जात असल्याच्या चर्चा केल्या जातात मग जुनसवड्याकडे दुर्लक्ष का? असं ते म्हणालेत. पर्यटनाच्या क्षेत्रात मोठमोठाले उपक्रम राबवले म्हणजेच त्याला चालना दिली असं होत नाही, राज्यात खरोखर गरज असलेल्या ठिकाणां देखील मदत केली पाहिजे असं सावंत यांनी सांगितलं.
सरकारने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा सांभाळ करणे हे निवडून दिलेल्या प्रतिनिधीचे काम आहे. मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर हे मांद्रेच्या जनतेसाठी काहीच करू शकत नाही, गेल्या तीन वर्षांत मांद्रे मतदारसंघात नेमके काय बदल झालेत हे समोर येऊन सांगावं असा आरोप अमित सावंत यांनी केलाय. "तुम्हाला नवीन प्रकल्प सुरु करता येत नसतील तर किमान पूर्वी सुरु केलेल्या प्रकल्पांना हातभार लावा" असा थेट निशाणा आमदारांवर साधण्यात आलाय.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.