Mandrem Murder Case: मांद्रेप्रकरणातील संशयित खुन्‍याला VIP ट्रिटमेंट? संतप्त नागरिकांनी खासगी वाहन रोखले

Mandrem Woman Car Murder Case: संशयित दीपन बत्रा याला मांद्रे पोलिस व्हीआयपी ट्रिटमेंट देत असल्याचा आरोप ग्रामस्‍थांनी केला. शेकडो मांद्रेवासीयांनी पोलिस स्‍थानकावर धडक दिली.
Mandrem Murder Case
Mandrem Police Station Dainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: मांद्रे येथील मारिया फर्नांडिस या महिलेचा गाडी अंगावर घालून खून करणारा दीपन राजू बत्रा (२३) याला मांद्रे पोलिस खाजगी वाहनातून इतरत्र हलवत असल्याची कुणकुण लागताच शेकडो मांद्रेवासीयांनी पोलिस स्‍थानकावर धडक दिली.

तसेच त्‍या वाहनाला घेराव घालून ते पोलिस स्‍थानकाच्‍या गेटवरच अडविले व तसेच मागे हटविण्यास भाग पाडले.संशयित दीपन बत्रा याला मांद्रे पोलिस व्हीआयपी ट्रिटमेंट देत असल्याचा आरोप ग्रामस्‍थांनी केला.

Mandrem Murder Case
Goa Accident: गोंयकार आणि दिल्लीकरांचे कुत्र्यावरुन जुंपले भांडण, महिलेने गमावला जीव; कार अंगावर घालत 10 मीटर नेले फरफटत

न्‍याय मिळेपर्यंत गप्‍प बसणार नाही

पोलिस निरीक्षक अर्ध्या तासाने घटनास्थळी पोहोचले. ॲड. प्रसाद शहापूरकर, सरपंच राजेश मांजरेकर व इतरांनी त्‍यांच्‍याशी चर्चा करून जोपर्यंत फर्नांडिस कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्‍ही गप्‍प बसणार नाही असा इशारा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com