illegal Liquor Dainik Gomantak
गोवा

Theft of Liquor : दुकानदाराला चकवा देत त्याने चोरल्या दारूच्या बाटल्या! सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद

गोव्यात गुन्ह्यांच्या घटनेत कमालीची वाढ झालेली दिसून आली आहे.

दैनिक गोमन्तक

Theft of Liquor : गोव्यात गुन्ह्यांच्या घटनेत कमालीची वाढ झालेली दिसून आली आहे. यामध्ये प्रामुख्याने चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार गोव्यात दारूच्या बाटल्या चोरण्याचा प्रकार उघडकीस आला असून हा प्रकार दुकानांच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

एक माणूस दोन वेगवेगळ्या दारूच्या दुकानात जाऊन दुकानदाराचे लक्ष नसताना अगदी शिताफीने दारूच्या बाटल्या चोरताना दिसत आहे. दुकानदाराच्या लक्षात येणार नाही याची तो काळजी घेत त्याला बोलण्यात गुंतवून तो चोरी करत आहे.

असे प्रकार गोव्यात वाढतच आहेत. याबद्दल योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी असाच एक प्रकार उघडकीस आला. मोरजीतील एका वाईन स्टोअरजवळ लावण्यात आलेली दुचाकी चोरीला गेली असून चोरीचा हा प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रस्त्याजवळ कोणी नसल्याचा फायदा घेत या चोराने ही चोरी केली. पेडणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT