Olive Ridley Turtle: मोरजी किनाऱ्यावरील ‘त्या’ पार्टीवर कारवाई होणार : विश्‍वजीत राणे

संबंधितांवर वन्यजीव कायद्याप्रमाणे कारवाई होणार
Vishwajit Rane
Vishwajit RaneDainik Gomantak

Olive Ridley Turtle: कासव संवर्धन केंद्र उभारलेल्या मोरजी किनाऱ्यावर कर्णकर्कश पार्ट्या आयोजित केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संबंधितांवर वन्यजीव कायद्याप्रमाणे कारवाईचे निर्देश दिल्याचे आज वनमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

Vishwajit Rane
Goa Police : लोकसंख्येच्या तुलनेत राज्यातील अपघातांचे प्रमाण अधिक

राणे म्हणाले, मोरजी समुद्र किनाऱ्यावरील कासव संवर्धन केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या पार्ट्यांना बंदी आहे. वन्यजीव कायद्याप्रमाणे तसे यापूर्वीच निर्देश दिले आहेत. तरीही या भागात स्थानिक लोकांच्या सहकार्याने या भागात मोठ्या आवाजाच्या आणि फ्लडलाईटचा वापर असणाऱ्या पार्ट्या रात्री उशिरापर्यंत चालतात.

शुक्रवारी रात्रीही अशाच प्रकारची पार्टी या संवर्धन परिसराच्या 100 मीटरच्या अंतरावर झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या परिसरात रात्रीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना मुख्य प्रधान वनसंरक्षकांना दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com