Calangute Dainik Gomantak
गोवा

Calangute: उघड्यावर कचरा टाकणे भोवले; जागीच ठोठावला 25 हजारांचा दंड

शेतात टाकलेला कचरा बाहेर काढला जात नाही, तोवर आम्ही शांत बसणार नाही - कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा

गोमन्तक डिजिटल टीम

कळंगुट (Calangute) येथे उघड्यावर कचरा टाकणे एका बांधकाम प्रकल्प मालकाला चांगलेच भोवले आहे. बांधकाम कामाचा आणि इतर कचरा उघड्यावर टाकल्याप्रकरणी कळंगुट पंचायतीने जागीच मालकाला 25 हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. गोवा नॉन-बायोडिग्रेडेबल कायद्याअंतर्गत (Goa Non-Biodegradable Act) त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. गुरूवारी (दि.10) सकाळी ही घटना घडली.

कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांना म्हापसाच्या दिशेने उभे असलेले एक संशयित वाहन दिसले. या व्यक्तीने पोरबावड्डो येथे रस्ता आणि शेताच्या बांधावर बांधकाम कचरा टाकला. त्याला विचारण्यात आले तेव्हा नागोवा येथे बांधकाम सुरू असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान सिक्वेरा यांनी या व्यक्तीला कचरा टाकताना रंगेहात पकडले.

सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी तात्काळ पंचायत सचिव अर्जुन वेळीप यांना घटनास्थळी बोलवले तसेच, पोलिसांना देखील याबाबत माहिती देण्यात आली. बांधकाम प्रकल्प मालक जयवंत सिंग यांनाही घटनास्थळी बोलवलून, त्यांना 25 हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला. पंचायत सचिवाने गोवा नॉन-बायोडिग्रेडेबल कायद्याअंतर्गत ही कारवाई केली.

"या कारवाईमुळे लोकांना बेजबाबदार वर्तण खपवून घेतले जाणार नाही याची जाणीव होईल. तसेतच, अशा पद्धतीने उघड्यावर कचरा टाकल्यास कडक कारवाई केली जाते, असा संदेश लोकांपर्यंत जाईल." असे पंचायत सचिव वेळीप म्हणाले.

"कचरा उघड्यावर टाकला जातो याबाबत आम्ही पोलिसांकडे अनेक तक्रारी केल्या, नियोजन आणि विकास प्राधिकरण तसेच, उपजिल्हाधिकारी यांच्याकडे देखील तक्रार केली. पण आजवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. आज याठिकाणी कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला रंगेहात पकडण्यात आले व दंड आकारण्यात आला. शेतात टाकलेला कचरा बाहेर काढला जात नाही, तोवर आम्ही शांत बसणार नाही," असे कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guhagar Accident: गुहागर-चिपळूण मार्गावर अपघात! रत्नागिरीकडे येणारा टेम्पो उलटला, रस्त्यावर विखुरले मासे; वाहतूक काहीकाळ ठप्प

Ronaldo Goa Visit: फुटबॉलप्रेमींचा हार्टब्रेक! अल नासर गोव्यात दाखल; ख्रिस्तियानो रोनाल्डो अनुपस्थित, चाहते नाराज

Narkasur Chor: गोव्यात 'नरकासुरच पळवला'!! भल्या पहाटे दुचाकीवरून नेला चोरून, व्हिडीओ पाहून हसू आवरेना; Watch Video

Pakistan ODI Captain: पाकिस्तान क्रिकेट क्षेत्रात खळबळ! रिजवानची केली हकालपट्टी; 'या' आक्रमक गोलंदाजाच्या हाती दिले नेतृत्व

Goa Politics: "आम्हाला कोणी बोलावलंच नाही",फातोर्डा मेळाव्यावर पालेकरांचा खुलासा; 'आप'शिवाय विरोधी पक्षांची एकजूट?

SCROLL FOR NEXT