WhatsApp New Feature: व्हॉट्सअपच्या फाडू फीचरची एंट्री; ग्रुप चॅट होणार आणखी सोप्प

कंपनीने आणखी एका फीचरवर काम सुरू करत, नवे फीचर आणले आहे.
WhatsApp New Feature
WhatsApp New FeatureDainik Gomantak
Published on
Updated on

व्हॉट्सअप दिवसेंदिवस अपडेट होत आहे, व्हॉट्सअपमध्ये एकामागून एक नवीन फीचर्स (Whatsapp New Feature) दाखल होत आहेत. काही दिवसांपूर्वी, व्हॉट्सअपने कम्युनिटीसह आणखी काही वैशिष्ट्ये लॉन्च केली. या ग्रुप चॅटमध्ये 1024 सदस्य सामाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंपनीने याच संबंधित आणखी एका फीचरवर काम सुरू करत, नवे फीचर आणले आहे.

WhatsApp New Feature
Tax Devolution To Goa: गोव्याला 450 कोटी; केंद्र सरकारचे राज्यांना कर हस्तांतरण

व्हॉट्सअपच्या कम्युनिटी ग्रुप चॅट फीचरमध्ये नोटिफिकेशन आपोआप बंद होतात, यामुळे यूजर्सना विनाकारण त्रास होत नाही. WABetaInfo ने दिलेल्या नुसार, सुरुवातीला हे फीचर केवळ बीटा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असणार आहे. WABetaInfo ने व्हॉट्सअपच्या नवीन फीचरचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.

WhatsApp New Feature
Sonalee Kulkarni सोनालीचा 'चॉकलेटी' अंदाज

स्‍क्रीनशॉटमध्‍ये तुम्‍हाला स्‍वत: ग्रुप चॅट म्यूट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यासह यूजर्सना ओके आणि अनम्यूट करण्याचा पर्याय देखील देण्यात आला आहे. अधिक सदस्य असलेल्या ग्रुपकडून वारंवार नोटिफिकेशन येत असतील तर ते ओके पर्याय निवडू शकतात. कंपनी येत्या काही दिवसांत सार्वत्रिक वापरासाठी उपलब्ध करू शकते. अशी माहिती कंपनीने दिली आहे.

व्हॉट्सअपने एक नोव्हेंबरपासून 'व्ह्यू वन्स' मेसेज फीचर बंद केले आहे. व्हॉट्सअप डेस्कटॉपसाठी हा बदल करण्यात आला आहे. व्हॉट्सअप डेस्कटॉपवर व्ह्यू वन्स एनेबल करून पाठवलेले संदेश उघडता येत नाहीत. येथे तुम्हाला "You received a view once message. For added privacy, you can only open it on your phone". असा मेसेज दिसेल. नवीन अपडेट सध्या काही बीटा वापरकर्त्यांसाठी आणले जात आहे. लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध होईल असे माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com