Crime News  Dainik Gomantak
गोवा

Morjim Crime: चिंताजनक! 'जमीन व्यवहारा'तून एकावर प्राणघातक हल्ला; पोलिसांकडून उशिरा गुन्हा दाखल

Goa Crime: जमीन विक्री किंवा दलाली करत असताना काही गुंडांकरवी मारहाण करण्याचे प्रकार सध्या वाढत आहेत. २ डिसेंबर रोजी मोरजी पंचायत क्षेत्रात डोंगरमाळरानावर काही व्यक्ती एकमेकांना जमिनी दाखवण्यासाठी गेले असता, त्या ठिकाणी एका बिल्डरच्या माणसाने राजेश फडते नामक व्यक्तीला मोठ्या प्रमाणात मारहाण करून जखमी केले.

गोमन्तक डिजिटल टीम

Morjim Assault Crime News

मोरजी: जमीन विक्री किंवा दलाली करत असताना काही गुंडांकरवी मारहाण करण्याचे प्रकार सध्या वाढत आहेत. २ डिसेंबर रोजी मोरजी पंचायत क्षेत्रात डोंगरमाळरानावर काही व्यक्ती एकमेकांना जमिनी दाखवण्यासाठी गेले असता, त्या ठिकाणी एका बिल्डरच्या माणसाने राजेश फडते नामक व्यक्तीला मोठ्या प्रमाणात मारहाण करून जखमी केले.

जखमी नागरिकाच्या बाजूने देशपांडे यांनी त्याच दिवशी मांद्रे पोलिस स्थानकावर लेखी स्वरूपात तक्रार दिली होती. परंतु मांद्रे पोलिसांनी संबंधित आणि संशयिताविरोधात उशिरा गुन्हा नोंदवला.

दरम्यान, मोरजी डोंगरमाळरानावर राजेश फडते यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्यामागे असलेल्या संशयिताविरोधात अजूनही पोलिसांनी तक्रार नोंदवली नाही. मात्र, मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्याविरोधात असलेली तक्रार लगेच नोंदवली गेली आणि दोन दिवसांनी संशयितांना पकडले. राजेश फडते यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे कोण आहेत? त्यांचा पोलिस अजून शोध का घेत नाहीत? असे प्रश्‍न आता नागरिक उपस्थित करत आहेत.

मांद्रे पोलिसांकडे संपर्क साधला असता राजेश फडते यांना ज्या पद्धतीने मारहाण झाली आहे ते पाहून त्यांच्या तक्रारीची दखल घेत मांद्रे पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मध्यस्थींना मिळते कमिशन

कमी वेळात जास्त पैसा कमावण्यासाठी काही नागरिक जमीन व्यवहारांमध्ये गुंतल्याचे स्पष्ट दिसते. ज्या ठिकाणी मोकळ्या जागा आहेत. त्या जागेची पाहणी दलाल करतात आणि नंतर एखादा जमीन विकत घेणारा सापडला तर त्याला ती जमीन विकतात. जमीनदाराकडून कमिशन आणि घेणाऱ्याकडूनही कमिशन मिळून लाखो रुपये जमीन विक्री करणाऱ्या मध्यस्थींना मिळतात. अशा व्यवहारातून खुनी हल्ले होण्याचे प्रकार आता घडत असल्याचे चित्र दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT