Goa Crime: वागातोर समुद्रकिनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिस तपास सुरु
Vagator BeachDainik Gomantak

Goa Crime: वागातोर समुद्रकिनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिस तपास सुरु

Vagator Beach: वागातोर समुद्रकिनाऱ्यावरुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वागतोर किनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
Published on

बार्देश: वागातोर समुद्रकिनाऱ्यावरुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वागातोर किनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या अज्ञात व्यक्तीचा मृत्यू कसा झाला याचा पोलिस तपास करतायेत. या व्यक्तीच्या शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या आहेत. हिंसक घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हणजूण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा तपास सुरु केला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला आहे. हा व्यक्ती गोव्यातील (Goa) आहे का बाहेरचा आहे? त्याचा खून करण्यात आला? खून करण्यामागे काय हेतू होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरीत आहे.

Goa Crime: वागातोर समुद्रकिनाऱ्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलिस तपास सुरु
Goa Crime: किरकोळ बाचाबाचीतून बागा-खाडीत चौघांना मारहाण; सराईत गुंड क्लियोफास फर्नांडिसला अटक

काही दिवसांपूर्वी, पेडण्यातील (Pernem) तेरेखोल नदीत झारखंडच्या कामगाराचा मृतदेह आढळून आल्याने अशीच खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून हा खूनाचा संशय व्यक्त केला होता. याप्रकरणी पेडणे पोलिसांनी खूनाचा गुन्हा नोंदवला होता. तेरेखोल नदीत झारखंडच्या कामगाराचा मृतदेह आढळल्याने त्याचा देखील खून झाल्याचा संशय व्यक्त केला गेला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com