गोवा दौऱ्यावर आलेल्या दीदींनी काँग्रेसला दिली मोठी ऑफर!

 

Dainik Gomantak

गोवा

गोवा दौऱ्यावर आलेल्या दीदींनी काँग्रेसला दिली मोठी ऑफर!

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) 2022च्या आधी काँग्रेस (Congress) आणि तृणमूल काँग्रेसमधील (TMC) अंतर वाढत चालले आहे. दोन्ही पक्षांमधील संवाद बिघडतांना दिसत आहे. तेव्हा पश्चिम बंगालमुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस (TMC) च्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांनी TMC ने भाजपशी (BJP) लढण्यासाठी गोव्यातील अनेक पक्षांसोबत युती केली आहे. काँग्रेसची इच्छा असेल तर ते त्यांच्यात सामील होऊ शकतात. मात्र, काँग्रेससाठी हा पर्याय असल्याचेही बॅनर्जी यांनी काल सांगितले आहे.

जेव्हा पश्चिम बंगालमध्ये रस्त्यावर पाणी येते, तेव्हा भाजप केंद्रीय तपास यंत्रणांना त्यांच्या गृहराज्यांमध्ये पाठवते, पण गोव्याचे नेते जेव्हा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरले जातात तेव्हा कोणतीही एजन्सी पुढे येतांनी दिसत नाही. "मला काँग्रेसविरोधात बोलायचे नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी काम करायचे आहे," असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

आम्ही गोव्यात MGP (महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष) सोबत युती केली आहे आणि NCP (Nationalist Congress Party) पक्षांसोबतही युती केली आहे त्याची अधिकृत घोषणा आज TMC करणार आहे. "भाजपला पराभूत करण्यासाठी आमची युती पुरेशी आहे, पण कॉंग्रेसला सामील व्हायचे असेल तर आमची हरकत नाही आम्हाला काही अडचण नाही. गोव्यात तुम्ही एकत्र लढले नाही तरी दुसरा कोणीतरी पुढाकार घेईल," असे बॅनर्जी म्हणाल्या.

"टीएमसी म्हणजे मंदिर, मशीद आणि चर्च! आम्ही भाजपशी लढत आहोत. जिंकण्याची काही संधी आहे का? आम्ही जिंकू शकतो यावर तुमचा विश्वास आहे का? तुमची खात्री पटली असेल तर मागे हटू नका. पुढे जा," असे आवाहन गोव्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या बॅनर्जी यांनी केले. "आम्ही येथे मतांचे विभाजन करण्यासाठी आलो नाही तर विखुरलेली मते एकत्र करण्यासाठी आणि टीएमसी आघाडीला विजयी करण्यासाठी आलो आहोत. हा भाजपला पर्याय आहे. कुणाला पाठिंबा द्यायचा हे आता गोमंतकीयांनी ठरवायचे आहे, आम्ही लढणार पण मागे हटणार नाही," असे ममता बॅनर्जी आज गोव्यात बोलत होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT