मुक्तीच्या 60व्या वर्षात प्रवेश करणारा गोवा भाजपच्या हातातून निसटणार का?

आधुनिक राजकारणातील समाजवादाचे सर्वात मोठे पुरस्कर्ते, ज्यांनी गोवा मुक्ती लढ्याचे नेतृत्व केले, ते राम मनोहर लोहिया होते
मुक्तीच्या 60व्या वर्षात प्रवेश करणारा गोवा भाजपच्या हातातून निसटणार का?

मुक्तीच्या 60व्या वर्षात प्रवेश करणारा गोवा भाजपच्या हातातून निसटणार का?

Dainik Gomantak

Published on
Updated on

कॅसिनोमध्ये (Casino) जाऊन रातोरात श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी, निळ्या रंगाच्या पारदर्शक पाण्याच्या समुद्राच्या प्रेमात असलेल्यांसाठी आणि देश-विदेशातील पर्यटकांची पहिली पसंती गोव्याला आहे, मात्र या पर्यटकांना (Tourist) गोव्याचा इतिहास माहीत नाही. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 14 वर्षांपर्यंत गोव्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त (Goa Liberation) करण्यासाठी प्रदीर्घ लढा द्यावा लागला होता. आधुनिक राजकारणातील (Goa Politics) समाजवादाचे सर्वात मोठे पुरस्कर्ते, ज्यांनी या लढ्याचे नेतृत्व केले, ते राम मनोहर लोहिया (Ram Manohar Lohia) होते, ज्यांनी एकदा खचाखच भरलेल्या लोकसभेत म्हटले होते की, 'ज्या दिवशी रस्ता शांत होईल त्या दिवशी देशाची संसद बिनकामी होईल'.

ज्या गोव्याने आपल्या समुद्रसौंदर्याने लोकांना भुरळ घातली, तोच गोवा पोर्तुगीज राजवटीपासून आपल्या स्वातंत्र्याचा 60 वा मुक्तीसंग्राम येत्या 19 डिसेंबरला साजरा करणार आहे. गोवा 19 डिसेंबर 1961 ला भारताचे राज्य बनले. गोव्यावर सुमारे 450 वर्षे पोर्तुगालांनी राज्य केल आहे. 1961 मध्ये गोवा मुक्त झाल्यानंतर भारतात विलीन होवूनही, 1987 मध्ये गोव्याला स्वतंत्र्य राज्याचा दर्जा मिळाला.

राजकीयदृष्ट्या, देशातील हे सर्वात लहान राज्य यावेळी सर्व राजकीय पक्षांच्या डोळ्याचे पारणे बनले आहे कारण यूपी आणि पंजाबप्रमाणेच पुढील वर्षाच्या सुरुवातीला गोवा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. गोवा विधानसभेत केवळ 40 जागा असल्या तरी तेथील भौगोलिक नकाशा आणि जगभरातून येणारे पर्यटक यामुळे सत्ता काबीज करणे हे प्रत्येक पक्षाचे मोठे स्वप्न व हेतू आहे. या सागरी राज्यावर काँग्रेसने वर्षानुवर्षे राज्य केले आहे. मात्र गेल्या निवडणुकीत बहुमत न मिळाल्याने भाजपला येथे आपले सरकार स्थापन करण्यात यश आले. गोव्याला नवसंजीवनी देण्याचे आणि भारतीय संस्कृती जिवंत ठेवण्याचे आणि ते आणखी मजबूत करण्याचे श्रेय आजही लोक भाजपचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांना देतात.

<div class="paragraphs"><p>मुक्तीच्या 60व्या वर्षात प्रवेश करणारा गोवा भाजपच्या हातातून निसटणार का?</p></div>
गोव्यातील कांग्रेसच्या 'बर्बादी' ची कहाणी

मात्र यावेळी भाजप आणि काँग्रेस किंवा तिथल्या प्रादेशिक पक्षांमध्ये तिरंगी लढत नसून ती जुळवाजुळव असल्याचं दिसत आहे. त्याचं कारण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आहे. या दोन्ही पक्षांनी गोव्याच्या निवडणुक रिंगणात मोठी उडी घेतली आहे. हे दोन्ही पक्ष भाजप आणि काँग्रेसच्या व्होटबँकेला खीळ घालण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत हे उघड आहे, पण शेवटपर्यंत सत्तेत असल्याने भाजपला अधिक फटका बसू शकतो, असे विश्लेषकांचे मत आहे.

पण मोठा प्रश्न हा आहे की, ममता बॅनर्जी यांनी अचानक बंगाल सोडून गोव्याची आठवण का केली, जिथे लोकसभेच्या दोनच जागा आहेत. याचे उत्तर देताना त्यांचे जवळचे लोक सांगतात की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दीदींनी टीएमसीला राष्ट्रीय दर्जाचा पक्ष बनवला आहे. संपूर्ण विरोधी पक्षाच्या वतीने त्या पंतप्रधानपदासाठी एक सार्वत्रिक उमेदवार बनू शकेल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे त्यांना बंगालमधून बाहेर पडून त्रिपुरा, गोवा आणि इतर राज्यांमध्ये आपली उपस्थिती नोंदवायची आहे.

ममता दिदी गेल्या महिन्यात अडीच दिवस गोव्यात आपल्या पक्षाची मजल मजबूत करण्यासाठी किंवा इतर राजकीय खेळी बसवण्यात व्यस्त होत्या. त्यांच्या गोवा दौर्‍याने दिल्लीच्या राजकीय वर्तुळातही खळबळ उडवून दिली होती. त्यांनी कोणते राजकीय डाव वापरले हे कोणाला माहीत नसले तरी त्यांचे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर गोव्यात तसेच बंगालमध्ये ममता यांच्यासाठी योजना आखत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी तेथे तळ ठोकला आहे. आणि आजही दिदी गोव्यात असून MGP-TMC पक्षाच्या युतीटी अधिकृत घोषणा करणार आहे.

गोव्यातील नाराज झालेल्या नेत्यांना तृणमूलशी जोडता यावे, यासाठी ते राष्ट्रीय आणि स्थानिक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्या त्यांच्या भेटी घेतल्या. त्यासाठी त्यांना विविध आश्वासनेही दिली जात आहेत. तसे, गोव्यात ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत, विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पार्टीसह तीन आमदार तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाल्याच्याही चर्चा रंगल्या. तृणमूलने यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती पण तसे होऊ शकले नाही.

गोव्याचे राजकारण जवळून समजून घेणाऱ्या लोकांच्या मते तेथील राजकीय वातावरण उत्तर भारतातील राजकारणापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. खरे तर गोव्यातील स्थानिक पक्षांनी नेहमीच निवडणुकीपूर्वी आपले सर्व पर्याय खुले ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच गोव्याच्या राजकारणातील नेतृत्व राष्ट्रीय पक्षाकडे असले तरी तेथील राजकारणात केवळ स्थानिक पक्षच 'किंग मेकर'च्या भूमिकेत राहिले आहेत, असे बोलले जाते.

2017 च्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजप राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आला होता. परंतु काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर भाजपला सुवर्णसंधी मिळाली. त्यानंतर सरदेसाई यांचा गोवा फॉरवर्ड पक्ष तसेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि कॉंग्रेसगट एकत्र येऊन त्यांनी बहुमत सिद्ध केले आणि सत्ता मिळवण्यात भाजप यशस्वी झाले. आता मात्र हे तिन्ही पक्ष वेगवेगळ्या दिशेने गेले आहे.

<div class="paragraphs"><p>मुक्तीच्या 60व्या वर्षात प्रवेश करणारा गोवा भाजपच्या हातातून निसटणार का?</p></div>
हाच का पर्रीकरांचा वारसा ?

ममता यांच्याशिवाय तिसरी शक्ती म्हणून उदयास येण्यासाठी केजरीवाल यांनीही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. गोव्यात रॅली काढून त्यांनी तिथल्या जनतेला अनेक आश्वासनही दिली. ममता आणि केजरीवाल हे दोघेही गोव्यातील जनतेसाठी नवीन आहेत. त्यामुळे ते दोघेही तिथून छोटे पक्ष घेऊन भाजपला सत्तेतून बेदखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र स्थानिक पातळीवर प्रामाणिक प्रतिमा असलेले किती तगडे नेते आपल्या पक्षाकडून उमेदवारी करून तिरंगी लढत घडवून आणतात, यावर गोवा निवडणुकीचे भविष्यातील चित्र अवलंबून असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com