Agonda Dainik Gomantak
गोवा

Agonda News : षष्ठी जत्रेला भक्तांचा महापूर; राज्यासह कर्नाटकातील भाविकांची उपस्थिती

Agonda News : श्री मल्लिकार्जुन देवस्थानात पौष शुक्ल पौर्णिमा ते फाल्गुन कृष्ण षष्ठीपर्यंत सुमारे दोन महिने तरंगोत्सव, अवतार पुरुषाचा अवसर, कौलप्रसाद, शीर्षारान्नी, वीरमेळा, शिमग्याचे मेळ आणि षष्ठीची जत्रा असे विविध पारंपरिक उत्सव साजरे करण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Agonda News :

आगोंद, श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवस्थानचा प्रसिद्ध शिमगोत्सव आणि षष्ठीच्या जत्रेसाठी भाविकांचा महापूर लोटला होता. रविवारी मध्यरात्री या जत्रेची सांगता झाली. या उत्सवाला गोव्यासह कर्नाटक राज्यातील कारवार, जोयडा व अन्य तालुक्यांतील भाविक उपस्थित होते.

काणकोणचे उपजिल्हाधिकारी मधू नार्वेकर, अन्य शासकीय अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, तसेच आबालवृद्धांनी अवताराची थरारक दृश्‍ये पाहिली आणि कौल प्रसाद प्राप्त केला.

श्री मल्लिकार्जुन देवस्थानात पौष शुक्ल पौर्णिमा ते फाल्गुन कृष्ण षष्ठीपर्यंत सुमारे दोन महिने तरंगोत्सव, अवतार पुरुषाचा अवसर, कौलप्रसाद, शीर्षारान्नी, वीरमेळा, शिमग्याचे मेळ आणि षष्ठीची जत्रा असे विविध पारंपरिक उत्सव साजरे करण्यात आले.

पौष महिन्यात अवतार पुरुषाची तरंगे, देवाचे भगत, देवाचे गडे, ढोल-जगाट वादक, व इतर सेवेकरी उत्तर कर्नाटकात फिरून तेथील कुळावी लोकांना कौलप्रसाद देऊन एका महिन्याने माघारी आले. नंतर काणकोणात प्रमुख घरवय-मठाजवळ अवतार व कौलप्रसाद झाला. तरंगे व भगत यांनी प्रमुख कुटुंबांच्या घरी भेट दिल्या. यावेळी कुटुंबप्रमुख तरंगांची पूजा करून देवाला ‘तळया’ अर्पण करून आशीर्वाद घेतात. पारंपरिक वीरमेळा, तसेच शिमगोत्सवाची सांगता झाली.

महाजनांच्या किशोरवयीन मुलांनी ‘गुढी सेवा’ श्रीचरणी अर्पण केली. संध्याकाळी गुलालोत्सव झाला. रात्री पालखी व नंतर सुवारी वादनाचा कार्यक्रम झाला. खोलकर बंधूंनी सुवारी वादनाची सेवा अर्पण केली. उत्सव यशस्वी करण्यासाठी कार्यकारी समिती, किंदळेकर देसाई, नगर्सेकर देसाई कुटुंबीय, वांगडी व महाजन कार्यरत होते.

अभूतपूर्व ‘दिवजांचा उपवास’

शुक्रवारी दिवजांची सेवा अर्पण करणाऱ्या सुवासिनींचा अभूतपूर्व ‘दिवजांचा उपवास’ झाला. या दिवशी मल्लिकार्जुन देवाला अभिषेक केला. रात्री ८ वाजता श्रींची पालखीतून मिरवणूक काढली. शनिवारी दिवजांची मिरवणूक व भोंवरी झाल्या.

पहाटे सुवासिनींनी दिवज घरवय - मठाजवळ प्रज्वलीत केले. पुढे मंदिर परिसरात ‘दिवजांच्या भोंवरी’त त्या सामील झाल्या. नंतर मिरवणुकीने मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. प्रार्थना करून दिवज ‘ओपले’ (मालवणे) झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT