Goa Accident Death
Goa Accident DeathDainik Gomantak

Goa Accident Death: कारच्या धडकेने जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू

Goa Accident Death: बामणवाडा-शिवोली येथे कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेला प्रमोद सुभाष नागवेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Goa Accident Death:

बामणवाडा-शिवोली येथे कारच्या धडकेत गंभीर जखमी झालेला प्रमोद सुभाष नागवेकर (वय 43 , रा. घाटेश्वरनगर खोर्ली) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात 20 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6.40 च्या सुमारास बामणवाडा-शिवोली येथे क्रॉसजवळ झाला होता.

शिवोली थिएटर ते चर्चदरम्यान येणाऱ्या जीए-03-एच-1185 क्रमांकाच्या वॅगनआर कारने विरोधी दिशेला जाऊन समोरून येणाऱ्या जीए-03-एडी-2416 क्रमांकाच्या ज्युपिटर स्कूटर आणि जीए-03-क्यू- 8293 क्रमांकाच्या एक्टीवा स्कूटरला धडक दिली होती.

या अपघातात ज्युपिटरचालक प्रमोद नागवेकर हे गंभीर जखमी झाले होते. तसेच एक्टीवा स्कूटरवरील जॉनी डिसोझा (वय ६१ वर्षे) आणि एलिझा डिसोझा (वय ५२ वर्षे, रा. बामणवाडा-शिवोली) हे जोडपे जखमी झाले होते. जखमींना म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले होते.

Goa Accident Death
Liquor Smuggling: गोव्याचे आणखी काहीजण रडारवर

तिथून प्रमोद नागवेकर यांना गोमेकॉत हलविले, तर इतर दोघांना उपचारानंतर घरी पाठवले.

चालकावर गुन्हा दाखल

नागवेकर यांच्यावर गेला महिनाभर गोमेकॉत उपचार सुरू होते. शुक्रवारी (ता. २९) सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातास कारणीभूत कारचालक प्रेमानंद चंद्रकांत नाईक (रा. देऊळवाडा-हरमल) याच्याविरुद्ध हणजूण पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. प्रमोद यांच्या मागे आई-वडील, दोघे भाऊ असा परिवार असून उद्या (शनिवारी) सकाळी त्यांच्यावर खोर्ली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com