Marina Project Dainik Gomantak
गोवा

Malim Marina Project: 8 कोटी खर्चून मालिम येथे होणार मरिना प्रकल्प! विरोध टाळण्यासाठी ‘यॉटसाठीचा धक्का’ असे नामकरण

Malim Marina Jetty Project Goa: मांडवी नदी ही राष्ट्रीय जलमार्ग ६८ म्हणून गणली जात आहे. त्या नात्याने हा धक्का बांधण्यासाठी भारतीय जलमार्ग प्राधिकरणाने कंपनीला ना हरकत दाखला दिला आहे.

Sameer Panditrao

पणजी: नावशी येथील मरिनाला होत असलेला विरोध कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याने आता मालिम येथे मरिना उभारला जाणार आहे. मात्र, येथेही विरोध होऊ नये यासाठी ‘यॉटसाठीचा धक्का’ असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे.

मांडवी नदी ही राष्ट्रीय जलमार्ग ६८ म्हणून गणली जात आहे. त्या नात्याने हा धक्का बांधण्यासाठी भारतीय जलमार्ग प्राधिकरणाने कंपनीला ना हरकत दाखला दिला आहे. राष्ट्रीय जलमार्गावर धक्का उभारण्यासाठी ना हरकत दाखला प्राप्त करणारी ती पहिली खासगी कंपनी बनली आहे.

केंद्रीय बंदरे, जहाजोद्योग आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते खासगी गुंतवणूकदारांना राष्ट्रीय जलमार्गांवरील पायाभूत सुविधा विकासासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सुरू केलेल्या डिजिटल पोर्टलच्या उदघाटनप्रसंगी हा दाखला कंपनीला प्रदान करण्यात आला.

मरिना इंडिया इन्फ्रास्ट्रक्चरला हा दाखला डिजिटल स्वरूपात देण्यात आला आहे. देशातील कोणत्याही राष्ट्रीय जलमार्गावर खासगी कंपनीला डिजिटल स्वरूपात दिलेला हा पहिला दाखला आहे. भारतीय जलमार्ग प्राधिकरणाने विकसित केलेले हे डिजिटल पोर्टल देशभरात अंतर्गत जलवाहतूक क्षेत्रात व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी आणि खासगी गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्यासाठी तयार केले आहे.

या उपक्रमाअंतर्गत अलीकडेच राष्ट्रीय जलमार्ग नियमावली २०२५ जाहीर केली असून, ती खासगी कंपन्यांना जलमार्गांवर टर्मिनल्स आणि सुविधा उभारण्यास आणि चालविण्यासाठी स्पष्ट आणि सोपी नियमावली पुरवते.

आठ कोटी रुपयांच्या मरिनाची खासियत

मरिना इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे हा धक्का उभारण्याचे काम सोपवले आहे.

ही कंपनी सुमारे ८ कोटी रुपये गुंतवून हा धक्का उभारणार आहे.

सुमारे ३० मीटर लांब, १६ खासगी यॉट आणि प्लेजर क्राफ्ट एकाच वेळी नांगरता येतील, असा हा प्रशस्त धक्का असेल.

नौकांचे डॉकिंग आणि अनडॉकिंग अधिक सुलभ पद्धतीने होण्यासाठी या धक्क्याचा आराखडा करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Writing History: माती, दगड आणि हाडे अशा वस्तूंवर चिन्हे कोरून, खुणांद्वारे विकसीत झालेली 'लेखनकला'

Rohit Sharma New Look: 'मुंबईच्या राजा'चा फिटनेस पाहून चाहते थक्क! तरुणांनाही लाजवेल असा रोहितचा नवा लूक!

Genetic Ancestry: पहिल्या आधुनिक मानवांचे वंशज सुमारे 60000 ते 40000 इ.स.पू. भारतात पोहोचले; जात आणि वंशपरंपरा

Russia Helicopter Crash: भीषण दुर्घटना! रशियाचं KA-226 हेलिकॉप्टर क्रॅश, 5 जणांचा मृत्यू Watch Video

केळीच्या गभ्याचा एक खांब तळ्यात उभा केला जातो, त्याला सुपारीच्या फळ्या लावून त्यावरती दिवे ठेवले जातात; गोव्यातील निसर्गपूजक संस्कृती

SCROLL FOR NEXT